मनोरंजन क्षेत्रात सध्या लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अशातच बॉलीवूड अभिनेता अरबाज खानही दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. आज (२४ डिसेंबरला) अरबाज मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न करणार असल्याचे सांगण्यात येते आहे. नातेवाईक व जवळच्या मित्र मंडळीच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा-

सलमान व अरबाजची बहिण अर्पिताच्या घरी अरबाज व शूराच्या लग्नाची तयारी करण्यात आली आहे. सलमान सह संपूर्ण खान कुटुंबीय या लग्नासाठी अर्पिताच्या घरी पोहचले आहेत. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिीडीमध्ये रविना टंडन, रिद्धिमा, यूलिया वंतूर पंडित अनेक कलाकार अर्पिताच्या घरी दाखल झालेले बघायला मिळत आहे.

अरबाज खान व शुरा यांची भेट ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आता लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. १९९८ साली अरबाजने अभिनेत्री मलायका अरोराबरोबर प्रेमविवाह केला होता. १९ वर्षांच्या संसारानंतर २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर आता मलायका मलायका अर्जुन कपूरला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे तर अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानीबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच अरबाज व जॉर्जियाचे ब्रेकअप झाले. आता अरबाज शुरा खानशी लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaaz khan wedding actor going to marry shura at arpita house video viral dpj