बॉलीवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे. अशातच अभिनेता अरबाज खान दुसरं लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या तीन दिवसांनंतर त्याचं लग्न होईल, असं कळतंय. अरबाज २४ डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न करणार आहे. लग्नाचा सोहळा खूपच खासगी असेल. या लग्नाला अभिनेत्याचे जवळचे कुटुंब आणि मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार अरबाज खान व शुरा यांची भेट ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दोघेही २४ डिसेंबर रोजी लग्न करणार आहेत. त्यांचं लग्न मुंबईतच होईल आणि या लग्नाला मोजकेच लोक उपस्थित असतील. अरबाज खानचे हे दुसरे लग्न असेल. अरबाजचे पहिले लग्न अभिनेत्री मलायका अरोराशी झाले होते.

आई अन् आजी सुपरस्टार, अभिनेत्याबरोबरच्या एका MMS ने संपवलं ‘या’ अभिनेत्रीचं करिअर; आता काय करते? वाचा

अरबाज खान व मलायका अरोरा यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यांनी १९९८ साली प्रेम विवाह केला होता. १९ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी मार्च २०१६ मध्ये विभक्त होण्याची घोषणा केली. मे २०१७ मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला होता. त्यानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत डेटिंग करत आहे. तर अरबाज खान जॉर्जिया अँड्रियानीसोबत डेटिंग करत होता. पण नंतर ते वेगळे झाले. जॉर्जियानेच अरबाजशी ब्रेकअप झाल्याचं सांगितलं होतं. आता अरबाज शुरा खानशी लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण याबाबत अरबाज, शुरा किंवा त्यांच्या कुटुंबाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

“हीन दर्जाचा…”, ‘जवान’ मधील शाहरुख खानच्या ‘त्या’ डायलॉगवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया

शुरा खान कोण आहे?

शुरा खान ही बॉलीवूडमधील लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटींबरोबरचे फोटो आहेत. त्यामध्ये रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी यांच्याबरोबरच्या फोटोंचा समावेश आहे. शुराने रवीना व राशाची मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaaz khan will marry makeup artist shura khan on 24 december in mumbai who is his she hrc