Arbaaz Khans wife Sshura Khan pregnancy rumors : बॉलीवूडमधील कलाकार अनेकविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असतात. आता अभिनेता अरबाज खान(Arbaaz Khan) हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

अरबाज खानची दुसरी पत्नी प्रेग्नंट आहे की नाही?

बॉलीवूड अभिनेता अरबाज खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वयाच्या ५७ वर्षी अरबाज खान पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याची दुसरी पत्नी शूरा व अरबाज हे दोघेही एका दवाखान्याबाहेर एकत्र दिसल्याने शूरा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये शूराचा बेबी बंप दिसत असल्याचेही म्हटले आहे. मात्र, सत्य वेगळे असल्याचे म्हटले जात आहे.

बॉलीवूड शादिजनुसार, शूरा व अरबाजने मॅटर्निटी क्लिनिकला भेट दिलेली नाही. अरबाज व शूरा हे डॉक्टर राकेश सिन्हा व मंजू सिन्हा यांच्या फायब्रॉइ़ड दवाखान्यामध्ये गेले होते. हा दवाखाना स्त्रीरोग शस्त्रक्रिया, फायब्रॉइड व गर्भाशय काढण्यासाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही डॉक्टरांची त्यांच्या कामगिरीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे अरबाज व शूरा हे कशासाठी आले होते, हे स्पष्ट झाले नसले तरीही समोर आलेल्या माहितीनुसार शूरा प्रेग्नंट नसल्याचे म्हटले जात आहे.

अरबाज व शूरा यांनी यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे शूरा व अरबाज आई-वडील होणार असल्याच्या चर्चा अफवा आहेत, असे म्हटले जात आहे. याआधी शूरा व अरबाजने कुटुंबाबरोबर ईद सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी त्यांनी पापाराझींसाठी पोज न दिल्याने त्यांची मोठी चर्चा झाली होती.

दरम्यान, अरबाजचे शूराबरोबरचे हे दुसरे लग्न आहे. त्याने याआधी मलायका अरोराबरोबर लग्नगाठ बांधली होती. १२ डिसेंबर १९९८ ला त्यांनी लग्नगाठ बांधली होती आणि २०१७ ला घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा आहे. अरबाज खानने २०२३ मध्ये शूराबरोबर लग्नगाठ बांधली. अनेकदा हे जोडपे कार्यक्रमांसाठी एकत्र हजेरी लावताना दिसते. आता अरबाज व शूरा या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.