Anil Arora Suicide: बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी आत्महत्या केली. त्यांनी इमारतीवरून उडी घेऊन जीवन संपवलं आहे. वांद्रेच्या आलमेडा पार्क इमारतीच्या सातव्या मजल्यावरून त्यांनी उडी घेतली. अनिल अरोरा यांच्या निधनाचे वृत्त कळाल्यावर अरबाज खान तिथे पोहोचला आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनिल अरोरा यांच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती, अभिनेता अरबाज खान अनिल अरोरा यांच्या घरी पोहोचला आहे. अनिल अरोरा यांच्या निधनाबद्दल कळताच मलायका अरोराचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान त्यांच्या घरी पोहोचला आहे. अरबाज तिथे पोहोचल्याचा व्हिडीओ आयएएनएसने शेअर केला आहे. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी अरबाज खान व पोलीस अधिकारी उपस्थित आहेत, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अनिल अरोरा यांनी आज (११ सप्टेंबरला) सकाळी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे येथील सात मजली इमारतीच्या छतावरून अनिल अरोरा यांनी सकाळी ९ वाजता उडी घेतली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaz khan reached at malaika arora home her father anil arora died see video hrc