मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे आमिर खान. अनेकदा तो चर्चेत असतो. आता अर्चना पूरन सिंह यांनी त्याच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेत्याची चर्चा होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“त्याने त्या गाण्यासाठी मद्यप्राशनाचा प्रयोग केला असावा…”

अर्चना पूरन सिंहने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘राजा हिंदूस्तानी’ या चित्रपटातील ‘तेरे इश्क में नाचेंगे’ या गाण्याच्या शूटिंगवेळी आमिर खानने खरंच मद्यप्राशन केले होते का, असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना अर्चना पूरन सिंहने म्हटले, “मी याबद्दल ऐकले आहे. आमचे जिथे शूटिंग सुरू होते, तिथे त्याची रूम माझ्या रूमच्या बाजूलाच होती. त्याने माझ्यासमोर कधीही मद्यप्राशन केले नाही, पण मला वाटते की त्याने त्या गाण्यासाठी मद्यप्राशनाचा प्रयोग केला असावा. पण, तो त्याच्या या प्रयोगाबद्दल खूश नव्हता.”

‘राजा हिंदूस्तानी’ चित्रपटाबद्दल अर्चना पूरन सिंहने म्हटले, “हा चित्रपट माझ्यासाठी खास होता. कारण या चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी मला फिल्मफेअर अवॉर्डमध्ये नॉमिनेशन मिळाले होते. या एकाच भूमिकेसाठी मला नॉमिनेशन मिळाले होते. नाहीतर मी कोणतेही पुरस्कार जिंकले नाहीत. जेव्हा परमित माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की, नॉमिनेशन हे देखील पुरस्कार जिंकल्यासारखे असते. त्यावेळी मला जाणीव झाली की मला पुरस्कार मिळणार नाही, पण तरीही पुरस्कार मिळाल्यासारखे वाटत होते.”

हेही वाचा: “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या

अर्चना पूरन सिंह ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसणार आहे. हा विनोदी कार्यक्रम १३ भागांचा असणार आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सीझन २१ सप्टेंबरपासून प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा शो पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘राजा हिंदूस्तानी’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. आजही या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते. एका लहानशा खेड्यातील टॅक्सी ड्रायव्हर एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो. त्यांच्यात असलेला फरक विसरून हे जोडपे कसे एकत्र येते, अशा आशयाची ही कथा आहे. या चित्रपटात आमिर खान, करिश्मा कपूर, अर्चना पूरन सिंह, जॉनी लिवर, मोहनीश बहल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. अर्चना या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसली होती. तिने करिश्माच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती, जी वडील आणि मुलीच्या नात्यात दुरावा निर्माण करत होती. हा चित्रपट धर्मेश दर्शन यांनी दिग्दर्शित केला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Archana puran singh reveals aamir khan experimented with drinking for raja hindustani song tere ishq main nachenge nsp