२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘आशिकी २’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटामुळे श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांच्या करिअरला भरारी मिळाली. नव्वदच्या दशकातल्या ‘आशिकी’ या चित्रपटाच्या या सिक्वेलला प्रेक्षकांनी पसंती दाखवली. ‘आशिकी २’ खऱ्या अर्थाने त्याच्या गाण्यांमुळे चालला. या चित्रपटाद्वारे अरिजीत सिंहने बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केले. त्याआधीही तो चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करत होता. पण या चित्रपटामुळे संगीत क्षेत्रामध्ये त्याची ओळख निर्माण झाली. अंकित तिवारी, मिथुन, जीत गांगुली यांनी मिळून या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले होते. दरम्यान या चित्रपटाशी संबंधित खास माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘आशिकी २’ मधील ‘चाहूँ मैं या ना’ आणि ‘मेरी आशिकी’ या दोन गाण्यांसाठी पलक मुच्छालने पार्श्वगायन केले होते. तेव्हापासून पलक आणि संगीत दिग्दर्शक मिथुन यांच्यामध्ये मैत्री झाली. पुढच्या महिन्यामध्ये ते दोघे विवाहबंधनामध्ये अडकणार आहेत. बऱ्याच वर्षांपासून ओळख असून सुद्धा एकमेकांना डेट करायचा विचार दोघांच्याही मनामध्ये आला नाही. दरम्यान ते अरेंज मॅरेज पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या नातेवाईकांद्वारे ही सोयरिक जमली आहे.

आणखी वाचा – गायिका कनिका कपूरने घेतली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट, फोटो शेअर करत म्हणाली…

पलकच्या आईवडिलांची तिने त्यांच्या पसंतीतल्या मुलाशी लग्न करावे अशी इच्छा होती. पुढे मिथुनच्या परिवाराला भेटल्यानंतर त्यांनी मिळून लग्नाची बोलणी पक्की केली. त्या दोघांचेही कुटुंबिय या लग्नाच्या तयारीला लागले आहेत. त्याच्या लग्नामध्ये हळद, मेहंदी, संगीत असे कार्यक्रम असणार आहेत. ६ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये त्यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. बॉलिवूडसह संगीत विश्वामधील दिग्गज या समारंभाला हजेरी लावणार आहेत.

आणखी वाचा – “वाद निर्माण होईल असं…” शरद केळकर स्पष्टच बोलला, अजय देवगणबाबतही महत्त्वाचं विधान

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतरचा त्याच्या रिसेप्शनचा कार्यक्रमही मुंबईमध्ये होणार आहे. त्या दोघांनीही लग्नासाठी थोडा वेळ ब्रेक घेतला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये ही नवविवाहीत जोडी हनिमूनसाठी परदेशी रवाना होणार आहे.