काही दिवसांपूर्वी म्हणजे १४ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३चा हा सर्वात मोठा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचे ७ गडी राखून पराभव केला. सध्या सोशल मीडियावर या सामन्यादरम्यानचे सेलिब्रिटीचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक प्रसिद्ध गायक अरिजित सिंह आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – MTV Roadies 19: यंदाही प्रिन्स नरुलाच्या पदरी अपयश; रिया चक्रवर्तीच्या गँगमधील वाशु जैनने मारली बाजी

अरिजित सिंहच्या फॅन पेजने हा व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, अरिजित अभिनेत्री अनुष्का शर्माचा फोटो काढताना पाहायला मिळत आहे. यावेळी अरिजित पहिल्यांदा इशाऱ्याने अनुष्काला सांगताना दिसत आहे. त्यानंतर अनुष्का एकाबाजूला फोटोसाठी विक्ट्रीची साइन करून पोझ देताना दिसत असून दुसऱ्याबाजूला अरिजित तिचा फोटो काढताना पाहायला मिळत आहे. सध्या अरिजित आणि अनुष्काचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले…

या व्हिडीओमधील अरिजितच्या साधेपणाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहे. या व्हिडीओवर अरिजितच्या चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा – “…आणि तो अद्भुत प्रवास संपला” शंकर महाराजांची भूमिका साकारलेल्या संग्राम समेळची भावुक पोस्ट, म्हणाला…

दरम्यान, अनेक सेलिब्रिटींनी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना लाईव्ह पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हजेरी लावली होती. या सामन्यादरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेलचा २४ कॅरेट गोल्ड आयफोन हरवल्याची घटना घडली. यासंदर्भात तिने स्वतः ट्वीट करून माहिती दिली.

Story img Loader