संगीत क्षेत्रातील सध्या आघाडीचं नाव अरिजीत सिंहचं आहे. अरिजीतने आपल्या सुमधूर आवाजाने तरुणाईंना वेड लावलं आहे. त्यामुळे प्रत्येक बॉलीवूड चित्रपटात अरिजीतचं गाणं असतंच असतं. सध्या अरिजीत सिंह एका कृतीमुळे खूपच चर्चेत आला आहे. त्याच्या या कृतीमुळे त्याला ट्रोल केलं जात आहे.

अरिजीत सिंहचे लाइव्ह कॉन्सर्ट नेहमी चर्चेत असतात. अलीकडेच अरिजीतचा दुबईत लाइव्ह कॉन्सर्ट पार पडला. या लाइव्ह कॉन्सर्टला सामान्य जनतेसह पाकिस्तानी लोकप्रिय अभिनेत्री माहिरा खान उपस्थित होती. यावेळी अरिजीतने माहिराची जाहीर माफी मागितली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Arjun Kapoor Fan shouting Malaika at Mere Husband Ki Biwi promotion video viral
Video: अर्जुन कपूरला पाहताच चाहत्याने घेतलं मलायकाचं नाव, अभिनेता वैतागून…; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Vicky Kaushal Viral Video
Video : विकी कौशलने जिममध्ये अजय-अतुलच्या ‘या’ मराठी गाण्यावर धरला ठेका; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
vicky kaushal
Video: विकी कौशलने पाटणामध्ये घेतला लिट्टी-चोखाचा आस्वाद; व्हिडीओ शेअर करीत म्हणाला…
Priyanka Chopra adorable gesture for bhabhi video viral
Video: नणंद असावी तर अशी! भावाच्या संगीत सोहळ्यात प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…

हेही वाचा – अद्वैत दादरकरनंतर ‘रमा राघव’ मालिकेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

याशिवाय दुबईतील लाइव्ह कॉन्सर्टमधील अरिजीत सिंहचा आणखी एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओत, लाइव्ह कॉन्सर्टमध्येच अरिजीत नखं कापताना दिसत आहे. अरिजीतची ही कृती पाहून नेटकरी त्याला खूप ट्रोल करत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हे खूप अनप्रोफेशनल आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अशी कृती करणं खूप चुकीचं आहे.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “अंघोळ पण कर.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “भाई रात्रीची नखं कापत नाहीत.” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहे.

हेही वाचा – Video: ‘नाच गं घुमा’ गाण्यावर पूजा सावंतचा बहिणीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

शिवाय काही नेटकऱ्यांनी लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अरिजीतने नखं का कापली? यामागचं कारण सांगितलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “गिटार वाजवताना त्याला त्रास होतं होता. म्हणून त्याने लाइव्ह दरम्यान नखं कापली.”

हेही वाचा – Video: सिद्धार्थ जाधव व सुरेश रैनाची झाली ग्रेटभेट, क्रिकेटरने अभिनेत्याचं केलं कौतुक; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, सध्या अरिजीत सिंह भारतात आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अरिजीत पत्नीसह स्कूटीवरून मतदान करायला गेल्याचा पाहायला मिळाल होतं. या व्हिडीओतील त्याच्या साधेपणाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली होती.

Story img Loader