Arijit Singh Ed Sheeran Scooter Ride Video : अरिजीत सिंह भारतातला सर्वात लोकप्रिय गायक आहे. त्याचे फक्त देशातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा अरिजीत आपल्या साधेपणासाठीही ओळखला जातो. ज्याच्या कॉन्सर्टला तुफान गर्दी असते असा अरिजीत खूप साधेपणाने आयुष्य जगतो. बरेचदा त्याचे स्कूटरवरून फिरतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरिजीत सिंह अशाच एका व्हिडीओमुळे सध्या चर्चेत आहे. पण यावेळी तो एकटा नव्हता. अरिजीतने जगप्रसिद्ध गायक एड शीरनला आपल्या स्कूटरवरून फिरवलं. दोघांचाही हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. गायक एड शीरन सध्या ‘द मॅथेमॅटिक्स टूर’ करत असून त्यासाठी तो भारतात आहे. भारतात आपल्या साधेपणाने आणि गाण्यांनी चाहत्यांची मनं जिंकत आहे. त्याने या आठवड्यात बेंगळुरूमध्ये दोन शो केले. आता तो गायक अरिजित सिंहबरोबर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंज येथे आहे. या दोघांनी संध्याकाळी एकत्र स्कूटरवर फेरफटका मारला. दोघेही हेल्मेट न घालता फिरत होते, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ओळखलं आणि व्हिडीओदेखील रेकॉर्ड केले.

इन्स्टाग्राम आणि एक्सवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अरिजीत स्कूटर चालवतोय, तर एड शीरन मागे बसला आहे. या दोघांबरोबर त्यांचे आणखी काही मित्र होते जे त्यांच्या स्कूटरवरून शहराच्या रस्त्यांवर फिरत होते. त्या दोघांना पाहून ‘शोले’मधील अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांची आठवण आली, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर ‘ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे’ हे गाणं आठवतंय, अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत. नेटकऱ्यांनी अरिजीत व एड शीरनच्या मैत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ –

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अरिजीत व एड शीरन यांनी जियागंजमध्ये वेळ घालवला. अरिजितने एड शीरनला फुरमोर व भागीरथीच्या काठांवर फिरवलं. दोघेही जवळपास पाच तास फिरले. ते दोघे बोटीने नदीत फिरायला गेले होते. तसेच एड शीरन व अरिजीतबरोबर सुरक्षा रक्षक नव्हते, त्यांनीच सुरक्षा रक्षकांशिवाय फिरण्याची परवानगी डीआयजीकडून घेतली होती.

अरिजीत सिंह व एड शीरनच्या व्हिडीओवरील कमेंट्स (सौजन्य – एक्स)

दरम्यान, एड शीरनने चेन्नई व हैदराबादमध्ये कॉन्सर्ट केले. त्याने शिल्पा रावबरोबर ‘चुट्टमल्ले’ हे तेलुगू गाणं गायलं, तर चेन्नईत ए.आर. रहमान यांच्याबरोबर ‘उर्वशी’ हे गाणं गायलं. तो पुढे शिलाँग (१२ फेब्रुवारी) आणि दिल्ली एनसीआर (१५ फेब्रुवारी) येथे परफॉर्म करणार आहे.