सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंह चांगलाच चर्चेत आहे. ‘टायगर ३’साठी अरिजितने गायलेलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सोशल मीडियावर सध्या या गाण्याचीच चर्चा आहे. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये अरिजित सिंह त्याच्या एका चाहत्यावर चांगलाच भडकलेला पाहायला मिळत आहे. अरिजितबरोबर एक सेल्फी घेण्यासाठी या चाहत्याने केलेली कृती पाहून तो चांगलाच वैतागला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अरिजितने नुकतंच मुंबईत ९ कोटींचे घर खरेदी केले असले तरी आजही तो पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद या शहरातच राहतो. ही घटना त्याच्या याच शहरात घडलेली आहे. अरिजित आपल्या गाडीत बसून बाहेर जात असताना एका चाहत्याने सेल्फी घेण्यासाठी गाडीचा हॉर्न वाजवत अरिजितचा पाठलाग केला. त्या चाहत्याने गाडी थांबवल्यावर अरिजित त्याला याबाबतीत खडसावतो.

आणखी वाचा : तब्बल ८ वर्षांनी इम्रान खान करणार कमबॅक; अभिनेता म्हणाला, “सध्या मी…”

सेल्फी घेण्यासाठी या चाहत्याने ७-८ वेळा गाडीचा हॉर्न वाजवला ज्यामुळे अरिजित वैतागला. एका सेल्फीसाठी इतरांना होणाऱ्या त्रासाची जाणीव अरिजितने तया चाहत्याला करून दिली. तो एक २२ वर्षाचा सुशिक्षित तरुण होता. अरिजित बंगाली भाषेत त्याच्याशी याबद्दल बोलत होता. शेवटी सेल्फीसाठी थांबवलेल्या चाहत्याला सेल्फी घेण्यास अरिजितने सांगितले.

‘टायगर ३’चा हिस्सा झाल्याने अरिजितची सध्या चांगलीच चर्चा आहे. तब्बल ८ वर्षांनी वाद बाजूला ठेवून सलमान आणि अरिजित एकत्र आले आहेत. एका पुरस्कार सोहळ्यात या दोघांमध्ये काही कारणास्तव शाब्दिक वाद झाले होते. यानंतर सलमानने त्याच्या ‘सुलतान’ चित्रपटातील अरिजितचे गाणेही काढून टाकले होते. आता ८ वर्षांनी प्रथमच अरिजित सलमानसाठी आवाज दिला आहे.