अरिजीत सिंह हा बॉलिवूडमधील आघाडीचा गायक आहे. जगभरात त्याचे असंख्य चाहते आहेत. त्याची अनेक गाणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आली आहेत. त्याचं गाणं लाइव्ह ऐकायला मिळावं यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. काही हजार रुपयांचे तिकिट विकत घेऊन त्याची गाणी लाइव्ह ऐकायला येणारी बरीच मंडळी आहेत. लवकरच त्याची कोलकत्ता येथे एक लाइव्ह कॉन्सर्ट होणार होता. मात्र आता तो रद्द झाल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे.

आपल्या बहारदार गायकीनं त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. कधीही कोणत्या वादात न सापडणारा अरिजित आता चर्चेत आला आहे. त्याच्या ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ या गाण्यामुळे त्याला मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय. या गाण्यामुळे त्याचा कोलकाता येथे होणारा एक कॉन्सर्ट रद्द करण्यात आला, असं म्हटलं जात होतं. पण याची दुसरी बाजू आता समोर आली आहे.

dilip kumar
दिलीप कुमार झोपलेले असताना धर्मेंद्र त्यांच्या घरात घुसले होते; अभिनेते म्हणालेले, “मी घाबरत जिना उतरला अन्…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
tharla tar mag sayali and arjun express love for each other
ठरलं तर मग! अर्जुनने पहिल्यांदाच वाजवली बासरी, सायलीने गायलं गाणं! गुडघ्यावर बसून स्वीकारणार लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट, पाहा प्रोमो
when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
chhaava film jane tu first song release starring vicky kaushal
हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंची साथ अन्…; ‘छावा’चं पहिलं गाणं प्रदर्शित! ‘तो’ क्षण पाहून चाहते झाले भावुक, म्हणाले…
lakhat ek amcha dada fame isha sanjay and juee tanpure dance on uyi amma
Video : सूर्या दादाच्या बहि‍णींचा जबरदस्त डान्स! सुपरहिट ‘उई अम्मा’ गाण्यावर थिरकल्या, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

आणखी वाचा : डिंपल कपाडिया यांनी अक्षय कुमारला घातली होती ट्विंकलबरोबर लिव्ह इनमध्ये राहण्याची अट, कारण…

कोलकातामधील इको पार्कमध्ये त्याचा हा लाइव्ह कॉन्सर्ट होणार होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा सुरू होती. या कॉन्सर्टसाठी अरिजीतने बरीच आधीपासून तयारी सुरू केली होती. पण आता तो कॉन्सर्ट रद्द झाल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे. राजकीय कारणांमुळे आणि हस्तक्षेपामुळे हा कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचं बोललं जात होतं. मात्र ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, तसं काहीही झालेलं नाहीये.

हेही वाचा : “अति नका करू….!” ; गायक अरिजीत सिंहने शेअर केला मेसेज

काही दिवसांपूर्वी कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर अरिजीतने ‘रंग दे तू मोहे गेरुआ’ हे गाणं गायलं होतं. त्यामुळे ही कॉन्सर्ट रद्द झाल्याचं बोललं जात होतं. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या गाण्यावरून मोठा वाद सुरु आहे. या चित्रपटात अरिजीतनेही एक गाणं गायलं आहे. त्याचा संबंधही अरिजीतच्या या गाण्याशी लावला जात होता. परंतु बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी या गोष्टींचं खंडन केलं आहे. ते म्हणाले, “जी-२० बैठक त्या पार्कच्या समोरच्या हॉलमध्ये होणार असल्याने या कॉन्सर्टला परवानगी देण्यात आली नाही. कॉन्सर्टच्या वेळी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक गर्दी करतील आणि त्या गर्दीला नियंत्रणात ठेवणं कठीण जाईल. त्यामुळे हा कॉन्सर्ट रद्द करण्यात आला आहे.”

Story img Loader