सध्या जुन्या सुपरहीट गाण्यांचा रिमेकचा ट्रेंड सुरू आहे. पण आता नव्या सिंगल म्हणून प्रदर्शित केलेल्या गाण्यांचाही रिमेक करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. मध्यंतरी ‘मनिके मागे’ या सिंहिली भाषेतील गाण्याची वेगवेगळी वर्जन्स आपल्याला ऐकायला मिळाली होती. तसंच आता पाकिस्तानी कोक स्टुडिओमुळे लोकप्रिय झालेलं ‘पसूरी’ या गाण्याचंसुद्धा नवं रिमेक गाणं सध्या चर्चेत आहे.
हेही वाचा- ट्रकवरची एक ओळ वाचून सुचलं होतं ‘पसूरी’ गाणं; पाकिस्तानी गायकाने सांगितला किस्सा
अरिजीत सिंगने गायलेले हे रिमेक गाणे मात्र प्रेक्षकांना अजिबात आवडले नाही. लोकांनी आता या गाण्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. निर्मात्यांनी मूळ गाणे खराब केल्याचा आरोपही अनेकांनी केला आहे. आता अरिजीतने ‘पसूरी’चे रिमेक गायला होकार का दिला याबाबतचा खुलासा केला आहे.
हेही वाचा- विकी कौशलने दिल्या सुखी वैवाहिक जीवनाच्या टिप्स; म्हणाला “गेल्या दीड वर्षात…”
अरिजीत म्हणाला, “गाण्याच्या निर्मात्यांनी मला वचन दिले आहे की ते एका वर्षासाठी गरजू मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शाळेला निधी देतील. त्यामुळे मी या गाण्यासाठी थोड्या शिव्या खायलाही तयार आहे.” अरिजितच्या या खुलाशानंतर अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत.
‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातील ‘पसूरी’च्या रिमेकला अरिजित सिंग आणि शे गिल या दोघांनी आवाज दिला आहे. हा चित्रपट यावर्षी २९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिक-कियारासह गजराज राव आणि सुप्रिया पाठक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.