प्रसिद्ध पार्श्वगायक अरिजित सिंहचे जगभरात लाखो चाहते आहेत. ‘आशिकी-२’ चित्रपटापासून अरिजित रातोरात स्टार झाला आणि आता त्याचे प्रत्येक गाणे सोशल मीडियावर व्हायरल होते. देश-विदेशातील विविध भागांमध्ये अरिजितच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले जाते. सध्या अरिजित एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे.

हेही वाचा : ‘स्वाभिमान’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाल्या, “लवकरच मी…”

छत्रपती संभाजीनगरमध्ये अरिजित सिंह लाइव्ह कॉन्सर्ट सुरू असताना आपल्या चाहत्यांशी बोलत होता. या वेळी एका व्यक्तीने अरिजितसोबत हात मिळविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा हात जोरात खेचला. यामुळे अरिजितचा तोल जाऊन त्याला किरकोळ दुखापत झाली. संबंधित व्यक्तीने असे वर्तन करूनही अरिजित अतिशय संयमाने त्याच्याशी बोलत आहे असे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अरिजितचा हात खेचल्यावर तो संबंधित व्यक्तीला म्हणतो, “ऐक, तू मला खेचत आहेस, प्लीज स्टेजवर ये… मला खरंच त्रास होत आहे. माझा हातही थरथरत आहे. तू इथे मजा करायला आला आहेस, काही हरकत नाही. पण जर मी परफॉर्म करू शकलो नाही, तर कोणीही या कॉन्सर्टचा आनंद घेऊ शकणार नाही. माझा हात इतका थरथरत आहे, मी पुढे कसं परफॉर्म करू? मी हा कॉन्सर्ट अर्धवट सोडून जाऊ का? तुम्ही कुठून लांबून जरी माझा कार्यक्रम पाहण्यासाठी येत असाल तरी ही पद्धत चुकीची आहे.”

हेही वाचा : “मला बायकोपण आहे आणि गर्लफ्रेंडसुद्धा…” लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोनमच्या पोस्टवर नवऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

अरिजितचे म्हणणे ऐकून उपस्थित जमाव ‘कॉन्सर्ट अर्धवट सोडू नकोस,’ अशी विनंती त्याला करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करताना म्हटले आहे की, “अरिजितने संयम न गमावता अतिशय शांतपणे हा संपूर्ण प्रसंग हाताळला,” तर दुसरा यूजर म्हणतो, “एक कलाकार त्याच्या प्रत्येक चाहत्यासाठी चार तास नॉनस्टॉप परफॉर्म करतो ही मोठी गोष्ट आहे. कृपया कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि अशा ठिकाणी गेल्यावर वर्तणूक चांगली ठेवा. लाइव्ह कॉन्सर्टमधील हा प्रकार अतिशय निंदनीय आहे.”

Story img Loader