गेल्या वर्षभरात बॉलीवूडचे अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. काही चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला, तर काही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. यापैकी एक म्हणजे ‘द लेडी किलर’. अजय बहल लिखित-दिग्दर्शित ‘द लेडी किलर’ ( The Lady Killer ) चित्रपट ३ नोव्हेंबर २०२३ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नवे कलाकार नसून बॉलीवूडचे नावाजलेले कलाकार मंडळी होती. अभिनेता अर्जुन कपूर ( Arjun Kapoor ) व अभिनेत्री भूमी पेडणेकर ( Bhumi Pednekar ) यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.

४५ कोटी खर्च करूनही ‘द लेडी किलर’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर पाहिजे तसं यश मिळालं नाही. त्यामुळे अर्जुन व भूमीच्या या चित्रपटाचा ओटीटीवरून पत्ताचा कट करण्यात आला आणि अखेर ‘द लेडी किलर’ युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला आहे. अर्जुन व भूमीच्या या चित्रपटाने किती कमाई केली होती? आणि फ्लॉप होण्यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या…

raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
Stree 2 box office collection
‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे
biggest Flop bollywood Movie of 2024
बॉलीवूड कलाकारांची फौज, तब्बल ३५० कोटींचे बजेट; मात्र चित्रपट ठरला सुपरफ्लॉप, कमावले फक्त…
India highest grossing movie in china Secret Superstar
फक्त १५ कोटींचे बजेट, कमावलेले ९०५ कोटी; चीनमध्ये सर्वाधिक कलेक्शन करणारा बॉलीवूड चित्रपट तुम्ही पाहिलाय का?

‘द लेडी किलर’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी खास प्रमोशन वगैरे करण्यात आलं नव्हतं. सोशल मीडियावर आणि ग्राउंड लेव्हला देखील या चित्रपटाचं प्रमोशन झालं नव्हतं. याचाच अधिक फटका अर्जुन कपूर ( Arjun Kapoor ) व भूमी पेडणेकरच्या या चित्रपटाला बसला. बॉक्स ऑफिसवर ‘द लेडी किलर’ चित्रपटाने फक्त ०.०१ कोटी रुपये कमावले होते. तसंच आता देखील निर्मात्यांनी टी-सीरिजच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं अजिबात प्रमोशन केलं नाही. या चित्रपटाची ओटीटीवर खरेदी केली नाही म्हणून आता युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – १५ वर्षांनंतर चिन्मय मांडलेकर ‘स्टार प्रवाह’साठी करणार काम, निवेदिता सराफ यांच्या नव्या मालिकेत अभिनेता म्हणून नव्हे तर…

The Lady Killer

युट्यूबवर ‘द लेडी किलर’ प्रदर्शित होताच दिग्दर्शक अजय बहल यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाला, “हां, हा चित्रपट अर्धा आहे. ११७ पानांच्या स्क्रिप्टमधील ३० पानांचं कधीच चित्रीकरण झालेलं नाही. खूप सारे सीन्स, अर्जुन ( Arjun Kapoor ) आणि भूमीचा रोमान्स, भूमीचे दारूवर अवलंबून राहणं, अर्जुनची मनःस्थिती…असं बरंच काही दाखवलं नाहीये.”

हेही वाचा – “विजेता आधीच ठरलेला असतो”, ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धकाचे वक्तव्य, म्हणाला…

तसंच अजय बहल पुढे म्हणाले, “‘द लेडी किलर’चं चित्रीकरण करणं खूप त्रासदायक होतं. हे कलाकारांमुळे नाही. अर्जुन ( Arjun Kapoor ) व भूमीबरोबर काम करणं खूप भारी होतं. त्यांनी तर या चित्रपटासाठी जीव ओतला होता.” ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, चित्रपट निर्माता भूषण कुमारने आऊटडोअर चित्रीकरणासाठी मनाई केली होती. उत्तराखंडमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण करायचं होतं. पण तिथे सतत पाऊस पडत होता. त्यामुळे जेवढा चित्रपट तयार झाला होता. तेवढाच ‘द लेडी किलर’ प्रदर्शित करण्यात आला.