रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून या चित्रपटात कलाकारांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. अजय देवगण आणि करीना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेतच. शिवाय ‘सूर्यवंशी’ आणि ‘सिंबा’ म्हणजेच अक्षय कुमार व रणवीर सिंहसुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. मध्यंतरी या चित्रपटाचा एक जबरदस्त अॅक्शन सीन शूट झाल्याचं करीनाने तिच्या पोस्टमध्ये शेअर केलं होतं.

मध्यंतरी या चित्रपटात दीपिका पदूकोण, टायगर श्रॉफदेखील झळकणार अशी बातमी समोर आली अन् काहीच दिवसांनी त्या दोघांचा फर्स्ट लुकदेखील समोर आला. त्याचवेळी या चित्रपटात अर्जुन कपूर खलनायक म्हणून दिसणार अशी चर्चाही रंगली होती. आता ती गोष्ट खरी ठरली आहे, नुकताच अर्जुन कपूरचा ‘सिंघम अगेन’मधील फर्स्ट लुक समोर आला आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

आणखी वाचा : “तुम्ही ५०० वर्षांपूर्वीचा इतिहास…”, शिल्पा शेट्टीचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘या’ कार्याचं केलं कौतुक

या फर्स्ट लुकमध्ये अर्जुन कपूर आजवर कधीच न पाहिलेल्या अवतारात दिसत आहे. अर्जुनचा भयानक अवतार लोकांनाही पसंत पडला आहे. अर्जुनच्या हातात एक मोठा कोयता पाहायला मिळत असून त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे शिंतोडे उडालेले आहेत. याबरोबरच या पोस्टमध्ये अर्जुन कपूर आणि रणवीर सिंगचाही एक फोटो शेअर करण्यात आला आहे.

अर्जुन कपूरच्या या फर्स्ट लूकची सध्या जबरदस्त चर्चा हॉट आहे. चित्रपटात आता नेमका अर्जुन हा खलनायक कसा साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रोहित शेट्टीनेही त्याच्या सोशल मिडीया अकाऊंटवर अर्जुनचा हा फर्स्ट लुक शेअर केला असून हा त्याच्या चित्रपटातील आजवरचा सर्वात भयानक व्हिलन असणार असल्याचीही माहिती त्याने दिली. या चित्रपटात अर्जुन कपूर थेट अजय देवगणशी पंगा घेताना दिसणार आहे. चाहते यासाठी फारच उत्सुक आहेत. ‘सिंघम अगेन’ १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’सुद्धा प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader