अर्जुन कपूर व भूमी पेडणेकरच्या ‘द लेडी किलर’ चित्रपटाचे पोस्टर एक आठवड्याआधीच प्रदर्शित करण्यात आले अन् त्याचवेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ३ नोव्हेंवर ठरवण्यात आली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला असून प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली आहे. हा एक अर्धवट चित्रपट असून तो प्रदर्शित करायची घिसाट घाई केल्याचंही काही लोकांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणतंही प्रमोशन न करता दिग्दर्शक अजय बेहल यांनी शुक्रवारी प्रदर्शित केलेल्या ‘द लेडी किलर’चे बॉक्स ऑफिसवर कलेक्शन फारच निराशाजनक आहे. मीडिया रीपोर्टनुसार पहिल्या दिवशी संपूर्ण देशात या चित्रपटाची फक्त २९३ तिकिटेच विकली गेली. ते पाहता या चित्रपटाचं कलेक्शन हे निव्वळ ३८००० रुपये इतकंच आहे. हे आकडे फारच चिंताजनक असले तरी याला कारणीभूत निर्माते व दिग्दर्शकाची घाई असल्याचं लोकांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा : शाहरुख, अल्लू अर्जुन नव्हे तर ‘हा’ आहे आशियातील महागडा सुपरस्टार; चित्रपटासाठी घेतोय २५० कोटींचे मानधन

काही मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटाचे बजेट हाताबाहेर जात होते अन् यात आणखी पैसे घालवण्यास निर्माते इच्छुक नसल्याने आहे तसाच चित्रपट प्रदर्शित करावा लागल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटाचे बजेट हे ४५ कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट ८०% पूर्ण आहे आणि २०% काम हे व्हॉईसओव्हर आणि टेक्स्टच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.

बॉलिवूड हंगामाला एका खात्रीशीर सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “१० हून अधिक दिवसांचे चित्रीकरण बाकी असताना ते मध्येच थांबवले गेले, कारण चित्रपटाचं बजेट फार वाढत होते. त्यांनी एडिटिंगच्या माध्यमातून ही बाब अत्यंत हुशारीने लवपायचा प्रयत्न केला आहे. केवळ दिलेल्या तारखेला चित्रपट पूर्ण करायचा असल्या कारणाने इतक्या गडबडीत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.” या चित्रपटाचे हक्क नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहे. त्यामुळे पुढील काहीच दिवसात हा चित्रपट ऑनलाइनसुद्धा पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoor bhumi pednekar starrer the lady killer is an incomplete film avn