अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी चर्चेत असतात. सध्या दोघांचा ब्रेकअपच्या सगळीकडे चर्चा रंगल्या आहेत. मलायकाशी ब्रेकअपनंतर अर्जून सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि अभिनेत्री कुशा कपिलाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चांवर आता अर्जून कपूरने मौन सोडलं आहे.
मलायकाने आंतरराष्ट्रीय श्वान दिनानिमित्त तिचा खास श्वान कॅस्परबरोबर एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मलायकाने कॅपश्नमध्ये लिहंल आहे, “आंतरराष्ट्रीय श्वान दिवस. आज, उद्या आणि नेहमी साजरा करत आहे. माझा सुपरस्टार कॅस्पर.”
मलायकाच्या या पोस्टवर अर्जुन कपूरने कमेंट केली आहे. अर्जूनने कमेंटमध्ये लिहिलं आहे. हा तुझ्या आयुष्यातील खरा स्टार आहे. देखणा मुलगा. या कमेंटबरोबर त्याने हार्ट आणि फायर इमोजीही शेअर केले आहेत. अर्जुन कपूरच्या या पोस्टनंतर चाहते पुन्हा एकदा दोघांच्या नात्यावर संभ्रमात पडले आहेत.
अर्जुन कपूरने याआधी त्याच्या इन्स्टा अकाउंटवर व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अर्जुन एकटा दिसत होता. या फोटोंवर मलायकाने कोणतेही कमेंट केली नव्हती. एवढंच नाही तर मुंबईत एपी ढिल्लनने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही मलायका एकटीच पोहचली होती. त्यानंतर दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते.