अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे खूप चर्चेत आला आहे. ‘मेरे हसबंड की बीवी’ असं अर्जुनच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अर्जुनसह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. २१ सप्टेंबरला ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे अर्जुन, भूमी आणि रकुल ठिकठिकाणी प्रमोशन करताना पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाच्या एका प्रमोशनदरम्यानचा अर्जुनचा कपूरचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिनेता एका चाहत्याच्या कृतीमुळे वैतागलेला पाहायला मिळाला.

व्हायरल व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. यावेळी कलाकारांना विचारलं जात, “तुम्हाला हा चित्रपट का आवडतो?” तेव्हा भूमी उत्तर द्यायला जात असते, तितक्यात अर्जुनचा चाहता ‘मलायका’ अशी जोरात हाक मारतो. त्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकतो. पण, अर्जुन वैतागतो आणि फक्त मान हलवताना दिसत आहे. अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचा ब्रेकअप झाला आहे. अर्जुनने स्वतः याबाबत सांगितलं होतं. दादर येथील शिवाजी पार्कातील दीपोत्सव २०२४मध्ये ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी उपस्थित राहिली होती. यावेळी अर्जुन कपूर देखील होता. तेव्हा एका चाहत्याने अर्जुनला ‘मलायका’ अशी हाक मारली. त्यावेळी अभिनेत्याने आता सिंगल असल्याचं सांगितलं होतं.

अर्जुन आणि मलायकाने २०१८पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. सुरुवातीला दोघांनी नातं गुप्त ठेवलं होतं. पण काही काळानंतर दोघांनी जगजाहीर केलं. त्यानंतर अर्जुन आणि मलायका नेहमी एकत्र व्हेकेशनसाठी जाताना दिसायचे. सोशल मीडियावर अनेकदा दोघांनी रोमँटिक फोटोदेखील शेअर केले होते. पण, २०२४मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. तेव्हापासून अर्जुन आणि मलायका अधूनमधून ब्रेकअप संदर्भात इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत असतात.

Story img Loader