Arjun Kapoor : नुकताच प्रदर्शित झालेल्या सिंघम अगेन या चित्रपटामुळे अर्जुन कपूर सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. अर्जुन कपूर त्याच्या अभिनयातील कामासह खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. एकीकडे चित्रपटाच्या यशाचा आनंद, तर दुसरीकडे मलायकाबरोबर ब्रेकअप झाल्यानं तुटलेल्या नात्याचं दु:ख, अशी काहीही अर्जुनची संमिश्र परिस्थिती आहे. अशात आता अर्जुननं त्याच्या सावत्र बहिणींशी त्याचं असलेलं नातं यावर वक्तव्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जुन कपूरनं नुकतीच ‘गल्लाटा इंडिया’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये त्याची सावत्र बहीण जान्हवी कपूरसुद्धा ऑडिओ संदेशाद्वारे सहभागी झाली होती. यावेळी अर्जुननं त्याचं बहिणींबरोबरचं नातं कसं आहे हे सांगितलं.

हेही वाचा : समांथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन; अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली भावनिक पोस्ट, म्हणाली…

अर्जुन कपूर म्हणाला, “आम्ही भावंडं दुर्दैवी परिस्थितीत एकत्र आलो; मात्र आता आम्ही एकमेकांची ताकद झालो आहोत. माझ्या आयुष्यातील प्रत्येक आनंदाचा क्षण खुशी आणि जान्हवीशिवाय अपूर्ण आहे. खुशी मी बरोबर नसतानाही माझा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. ती माझी फार काळजी करते.”

अर्जुनबद्दल जान्हवी काय म्हणाली?

कार्यक्रमात जान्हवीनं एक ऑडिओ संदेश पाठवला होता. त्यात ती म्हणाली, “मी दोन वर्षांपासून त्याला वाट पाहताना पाहिलं आहे. प्रत्येकाला माहीत आहे की, त्याच्यासाठी ही सोपी गोष्ट नव्हती. त्यानं नेहमी प्रत्येक गोष्टीवर मोठ्या हिमतीनं मात केली आहे. मात्र, मला हेही माहीत आहे की, त्याच्या आयुष्यात असे दिवस आले; ज्यात चांगले काही होईल याची आशा ठेवून जगत राहणे किती कठीण होतं. पण, त्यानं यातून बाहेर पडण्यासाठी दाखवलेल्या हिमतीचं मला कौतुक आणि गर्व आहे.”

जान्हवीचा हा संदेश ऐकून अर्जुन काहीसा भावूक झाला होता. त्यानं पुढे सांगितलं, “जान्हवी माझ्या जास्त जवळची आहे. कारण- आमच्या वयात जास्त अंतर नाही. खुशी आणि जान्हवी दोघीही माझ्या आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये माझी साथ देतात. मलाही या गोष्टीचा फार आनंद आहे की, मी मोठ्या भावाप्रमाणे त्यांची सर्व काळजी घेतो.”

हेही वाचा : Video: “आशूच्या केसालादेखील धक्का…”, आशूचा जीव वाचवण्यासाठी शिवा-सूर्या येणार एकत्र; पाहा व्हिडीओ

“जान्हवीनं माझी कमजोर बाजू पाहिली आहे. आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. त्यात आपण खचतो आणि आपल्याला अनेक प्रश्न पडतात. या स्थितीत आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभं असणं गरजेचं असतं. जान्हवीने माझा त्रास अगदी जवळून पाहिला आहे. मी कोणत्या त्रासातून जात होतो, हे तिला पूर्णपणे समजत होतं”, असंही त्यानं यावेळी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arjun kapoor feel grateful for stepsisters janhvi khushi in his life rsj