गेल्या काही वर्षांमध्ये अर्जुन कपूरचे बरेचसे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले आहेत. यावरुन त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहे. फ्लॉप चित्रपटांमुळे तो सोशल मीडियावर ट्रोल देखील होत आहे. तो सध्या मलायका अरोराला डेट करत असल्यामुळेही तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. त्याने एमटिव्हीच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेव्हा शाहरुख खानबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे अर्जुन कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
एमटीव्हीवरील ‘निषेध’ या कार्यक्रमाच्या लॉन्च शोमध्ये अर्जुन कपूर प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. तेथे विचारलेल्या प्रश्नाची त्याने मोकळेपणाने उत्तरे दिले. तेव्हा एका पत्रकारने अर्जुनला “आपल्याकडे लग्न करुन स्त्री आणि पुरुष दोघांनी एकाच जोडीदारासह राहावं अशी मान्यता आहे. भारतासारख्या देशामध्ये जेथे लग्नाआधी संभोग करणं चुकीचं मानली जातं, असे असताना लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर, एकापेक्षा जास्त व्यक्तीबरोबर शारिरीक संबंध ठेवणे किंवा ओपन सेक्स अशा संकल्पनाबद्दल तुमचं मत काय आहे?”, असा प्रश्न केला. पुढे त्याने शाहरुख खानच्या चित्रपटाचा संदर्भ देत “आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो आणि लग्न सुद्धा एकदाच करतो”, असे म्हटले.
हे ऐकून अर्जुन “तुम्ही जे म्हटलात ते कोणी सांगितलं आहे?” असा प्रश्न विचारला. तेव्हा त्या पत्रकाराने ‘शाहरुख खान’ हे उत्तर दिले. त्यानंतर अर्जुन म्हणाला, “शाहरुख खान भारताची ओळख नाहीये. चित्रपटामध्ये ती कल्पना शाहरुख प्रमोट करत होता. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ-उतार असतात. तुम्ही नव्या लोकांना भेटता, नवी नाती जोडता. लग्न करण्याचा निर्णय घेणं प्रत्यक्ष लग्न करण्यापेक्षा जास्त कठीण असतं. लग्नापर्यंत पोहोचण्यासाठी काही गोष्टी घडाव्या लागतात.”
तो पुढे म्हणाला, “लग्नापूर्वी प्रत्येकाच्या मनात कुतूहल असतं. समोरच्या व्यक्तीला भेटून तुम्ही त्याच्याशीच तुमचं लग्न होईल. हे ठरवू शकत नाही. ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे वयाच्या १८-२० व्या वर्षी ठरवता येत नाही. या वयात प्रेमाचा अर्थही कळालेला नसतो. अनेकदा काम, करिअर अशा गोष्टींमुळे तुम्ही त्या व्यक्तीपासून दुरावता. अशा गोष्टी केलेल्या चालतात, त्यात काहीही गैर नसतं. पण जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त पार्टनरसह शारिरीक संबंध ठेवण्यासारखे प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही चूक करता. हा व्हिडीओ गेम नाहीये. त्यामुळे तुमचा प्रश्न बदला.”