अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बॉलीवूडचं लोकप्रिय जोडपं आहे. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात आणि वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. वयात १२ वर्षांच अंतर असल्यामुळे मलायका आणि अर्जुनला अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं, तरीही इतकी वर्ष त्यांचं नात कधी डगमगलं नाही. परंतु, आता या जोडप्याचं पाच वर्षांच रिलेशनशिप संपुष्टात आलं असल्याची चर्चा सुरू आहे.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, त्यांच्या अनेक सूत्रांनी असं सांगितलंय की, या जोडप्यानं आता वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. सूत्रांनी अशीही माहिती दिली की, त्यांचं नातं आता संपलं आहे आणि ते या परिस्थितीला अत्यंत सन्माननीय रीतीने सामोरे जाणार आहेत.

Salim Khan
“काही वर्षानंतर…”, हेलन व सलमा खान यांच्यातील नात्यावर बोलताना सलीम खान म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
If Diva Ratnagiri train does not start from Dadar then Gorakhpur train will be stopped
दिवा रत्नागिरीला दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखू , प्रवाशांचा इशारा
premachi goshta tejashree pradhan exit and swarda thigale enters in the show
तेजश्री प्रधानची Exit, स्वरदाची एन्ट्री! ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये ‘या’ दिवशी येणार नवीन मुक्ता, सईबरोबरचा भावनिक प्रोमो आला समोर
Chhagan Bhujbal Uday Samant
लाडक्या बहिणींना भुजबळांचा इशारा; योजना बंद होणार? उदय सामंत म्हणाले, “आम्हाला सत्तेपर्यंत…”
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट

एका सूत्राने त्यांना सांगितलं की, “मलायका आणि अर्जुनचं नातं खूप खास होतं आणि ते दोघंही एकमेकांच्या हृदयात त्यांचं विशेष स्थान कायम ठेवतील. त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे आणि या प्रकरणी त्यांनी सन्माननीय मौन पाळलं आहे. त्यांच्या नात्याबद्दल वाईट साईट बोलण्याची ते कोणालाही परवानगी देणार नाहीत.”

अर्जुन आणि मलायकाची लव्हस्टोरी

अर्जुन आणि मलायकाने जेव्हा २०१८ मध्ये एका फॅशन शो कार्यक्रमात एकत्र हजेरी लावली होती तेव्हा त्यांच्या नात्याच्या अफवा सुरू झाल्या होत्या. अखेरीस मलायकाच्या ४५व्या वाढदिवशी, त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची पुष्टी केली. अधिकृत केल्यानंतर त्यांनी एकमेकांच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवायला सुरुवात केली. ‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये एकदा अर्जुनने त्यांच्या नात्याला आता एक सुंदर वळण देण्याबाबतही भाष्य केलं होतं.

हेही वाचा… ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम शिवानी नाईक आणि सिंबाचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, चाहते म्हणाले…

मलायकाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झाल्यास, १९९८ साली मलायका अरोरा आणि अरबाज खान लग्नबंधनात अडकले होते. १९ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर अभिनेत्रीने अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली.

दरम्यान, अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर खलनायकाची भूमिका साकारणार आहे. करीना कपूर, दीपिका पदुकोण, अजय देवगण, रणवीर सिंग अशी तगडी स्टार कस्ट या चित्रपटाला लाभली आहे. तर आगामी चित्रपट ‘नो एन्ट्री-२’ मध्येदेखील अर्जुन झळकणार आहे. तर मलायका रिअ‍ॅलिटी शो आणि ब्रॅंड एंडोर्समेंट अशा कामांमध्ये व्यग्र आहे.

Story img Loader