बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सचा विषय निघाला की मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं नावही त्यात घेतलं जातं. त्या दोघांनी आत्तापर्यंत एकमेकांशी लग्न केलं नसलं तरीही त्यांच्या रिलेशनशिपमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. आता व्हॅलेंटाईन डेनिमित्त अर्जुनने मलायकासाठी एक खास पोस्ट केली आहे.
अर्जुन आणि मलायका गेली अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. ते अनेक कार्यक्रमांना पार्ट्यांना एकत्र हजेरी लावतात. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर ही सक्रिय राहून ते एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करत असतात. आता अर्जुन कपूरने व्हॅलेंटाईन डे निमित्त त्याचा आणि मलायकाचा एक फोटो पोस्ट केला, जो आता चांगलाच चर्चेत आला आहे.
आज अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या व्हॅलेंटाईनबरोबरचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं. तर आज अर्जुननेही त्याचा आणि मलायकाचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोत मला एका हातात सरबताचा ग्लास घेऊन उभी असलेली दिसत आहे. अर्जुन ने दिला पाठीमागून मिठी मारल्याचं दिसत आहे.
हेही वाचा : मलायका अरोरा – अरबाज खान पुन्हा येणार एकत्र ? फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
आता या फोटोवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे. एक नेटकरी म्हणाला, “तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसतात.” तर दुसऱ्याने लिहिलं, “मेड फॉर इच अदर.” आणखी एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “एवढं सगळं करताय तर लग्नही करून टाका आता.” तर अनेकांनी या फोटोवर कमेंट करत लग्न कधी करणार असं त्यांना विचारलं. आता अर्जुन मलायकाचा हा फोटो चांगलाच चर्चेत आला आहे.