अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असतात. गेली अनेक वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या नात्याबद्दल ते वेळोवेळीच्या त्यांना अपडेट्स देत असतात. आता मलायकाबरोबर रिलेशनमध्ये आल्यावर अर्जुनच्या आयुष्यात काय बदल झाला आहे हे त्याने सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्जुन कपूर सध्या त्याच्या ‘कुत्ते’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु हा चित्रपट चित्रपटगृहात फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने अनेक मुलाखती दिल्या. यातील नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने मलायका त्याच्या आयुष्यात आल्यावर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला हे सांगितलं आहे.

आणखी वाचा : Shark Tank India 2: कार्यक्रमात लाखांचे व्यवहार करणाऱ्या शार्क्सना कोट्यवधींचा फटका? प्रसिद्ध लेखकाची खळबळजनक पोस्ट

अर्जुन कपूर म्हणाला, “आम्ही दोघं अनेक वर्ष एकमेकांना डेट करत आहोत. तिच्या माझ्या आयुष्यात येण्याने माझ्या आयुष्यात बराच बदल झाला. पण मला महत्त्वाची गोष्ट जाणवली की, तिला डेट करायला लागल्यापासून मला रोज रात्री शांत झोप लागते.” त्याच्या या उत्तरातून त्यांच्यातलं नातं किती घट्ट आहे पुन्हा एकदा त्याने चाहत्यांना दाखवून दिलं.

हेही वाचा : “…म्हणून मी गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहिले”; मलायका अरोराने सांगितलं कारण

दरम्यान अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’ या चित्रपटाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत नसले तरी मलायका अरोराने त्याच्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट करत तिला हा चित्रपट आवडल्याचं तिने नुकतंच सांगितलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोघांकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधलं गेलं आहे.