गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरच्या ‘कुत्ते’ (Kuttey) चित्रपटाची चर्चा सुरु आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता होती. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अर्जुनचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. तर मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरचीही यामध्ये झलक दिसते.

आणखी वाचा – “आयुष्य बदललं कारण…” लग्नानंतर राणादा कसं जीवन जगतो? घरातून बाहेर पडताना बायकोला व्हिडीओ कॉल केला अन्…

Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Indians deported entering us via donkey route
अग्रलेख : ‘डंकी’ डंख!
US will take over Gaza Strip,
गाझा पट्टी ताब्यात घेऊ!ट्रम्प यांची धक्कादायक घोषणा; अमेरिकेच्या मित्रांकडूनही विरोध
Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
cidco protest for water news
नाशिक : सिडकोत पाण्यासाठी आंदोलन, महापालिकेचा निषेध
Will Trump start a war over the Panama Canal Why is this issue so important to America
पनामा कालव्यासाठी ट्रम्प युद्ध छेडणार? अमेरिकेसाठी हा मुद्दा इतका महत्त्वाचा का?

चित्रपटाचा ट्रेलर पाहता ‘कुत्ते’ची कथा गुन्हेगारी विश्वावर आधारित असल्याचं पाहायला मिळतं. शिवाय या ट्रेलरमध्ये शिवीगाळही ऐकायला मिळत आहे. एका गाडीमध्ये तीन ते चार कोटी रुपये असल्याची बातमी पोलिस तसेच गुन्हेगारांना मिळते.

पाहा ट्रेलर

तीन ते चार कोटी रुपये चोरीला गेल्यानंतर गँगस्टर व पोलिसांमध्ये नेमकं काय घडतं? हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अर्जुनचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळत आहे. तर तब्बूची धमाकेदार एण्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे.

आणखी वाचा – …अन् रणवीर सिंगने चक्क प्राजक्ता माळीचा हात पकडला, अभिनेत्रीही भारावली, म्हणाली, “मला त्याच्याशी…”

काही सेकंदासाठी इंटिमेट सीनही या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत. तब्बू पोलिस ऑफिसरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. अर्जून-तब्बूसह चित्रपटात नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, राधिका मदन आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. डार्क कॉमेडी थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन आसमान भारद्वाजने केलं आहे. येत्या १३ जानेवारील चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

Story img Loader