Arjun Rampal Girlfriend Gabriella blessed with baby boy : अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेंड मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. गॅब्रिएलाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. या जोडप्याला तीन वर्षांचा मुलगा आहे, आता पुन्हा त्यांच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला आहे. गॅब्रिएलाने २० जुलै रोजी मुलाला जन्म दिला. अर्जुनने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर पतीपासून घटस्फोट घेणार?
“मला आणि माझ्या कुटुंबाला आज एका सुंदर मुलाचा आशीर्वाद मिळाला, आई आणि मुलगा दोघेही बरे आहेत. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद,” असं कॅप्शन अर्जुनने दिलंय. सोबतच त्याने #20.07.2023 व #helloworld असे हॅशटॅग दिले आहेत. याबरोबर त्याने hello world लिहिलेल्या एका टॉवेलचा फोटो पोस्ट केला आहे.
अर्जुनच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, गॅब्रिएलाने मे महिन्यात मॅटर्निटी फोटोशूटमधील काही फोटो पोस्ट करत दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. अर्जुन व गॅब्रिएला दुसऱ्यांदा पालक झाले आहेत.
१० हजार साड्या, ८०० किलो चांदी, २८ किलो सोनं अन्…, तब्बल ९०० कोटींची संपत्ती असलेली अभिनेत्री
अर्जुन रामपाल आणि त्याची पहिली पत्नी मेहेर जेसिका यांनी २१ वर्षांच्या संसारानंतर २०१९ मध्ये घटस्फोट घेतला. तेव्हापासून अर्जुन गॅब्रिएलाला डेट करतोय. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहे, तर गर्लफ्रेंडपासून एक तीन वर्षांचा मुलगा होता आणि आता ते दुसऱ्यांदा एका गोंडस मुलाचे आई-बाबा झाले आहेत.