बॉलीवूड अभिनेता आणि ‘बिग बॉस’ फेम अरमान कोहली हा कामामुळे कमी आणि वादांमुळेच जास्त चर्चेत असतो. ड्रग्ज प्रकरणात तुरुंगवास भोगून आलेला अरमान आता त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. एक्स गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने अरमान कोहलीला दोन पर्याय दिले आहेत. तिला पैसे द्यावे, नाहीतर तुरुंगात जावं, यापैकी एक पर्याय अरमानला निवडावा लागणार आहे.
२०१८ मध्ये अरमानविरोधात त्याची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने मारहाणीची तक्रार दिली होती. या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने अरमानला दोन पर्याय दिले आहेत. पहिला म्हणजे त्याने निरूला ५० लाख रुपये देऊन या प्रकरणी तडजोड करावी आणि दुसरा म्हणजे पैसे द्यायचे नसतील तर त्याने तुरुंगात शिक्षा भोगण्यास तयार राहावे. अरमानला १८ जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे. त्याने याबाबत अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
“…म्हणून आम्ही मुलीचं नाव ज्युलिया ठेवलं,” ‘बाईपण भारी देवा’मधील मराठमोळ्या सुकन्या मोनेंचा खुलासा
नीरू रंधावाने २०१८ मध्ये अरमान कोहलीविरोधात गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत नीरूने म्हटलं होतं की ती आणि अरमान तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघे मुंबईतील सांताक्रूझ फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते. अभिनेत्याने तिला पायऱ्यांवरून खाली ढकललं होतं आणि तिचं डोकं भिंतीवर आदळलं होतं. त्यावेळी पुन्हा असं न करण्याबद्दल अरमानने कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं होतं. पुन्हा तिला मारहाण केल्यास ५० लाख रुपये देईन, असं तो कोर्टात म्हणाला होता. त्यामुळे आता त्याला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुरुंगात जावं लागणार.