सनी देओल, जॅकी श्रॉफ व विनोद खन्ना या कलाकारांबरोबर काम करणारी एक उत्तम अभिनेत्री, जिने ८० चं दशक गाजवलं. या अभिनेत्रीबरोबर त्याकाळच्या आघाडीच्या सर्वच कलाकारांची काम करायची इच्छा होती. या अभिनेत्रीचं नाव विनोद खन्ना यांच्याशी जोडलं गेलं होतं. पुढे या अभिनेत्रीने तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान अभिनेत्याशी आंतरधर्मीय लग्न केलं आणि याचा तिच्या करिअरवर परिणाम झाला.

ही अभिनेत्री तिच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती असं म्हटलं जातं. नंतर तिने १२ वर्षांनी लहान अभिनेत्याबरोबर संसार थाटला आणि त्याचं लग्न फक्त १३ वर्षे टिकलं. आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिलेली ही अभिनेत्री म्हणजे अमृता सिंह होय. अमृताने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली.

अमृताने स्वत: तिच्या एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला आईचा विरोध होता. पण आईच्या विरोधात अमृताने या क्षेत्रात करिअर केलं. अमृताने १९८३ मध्ये सनी देओलबरोबर ‘बेताब’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्या चित्रपटातूनच तिला खूप लोकप्रियता मिळाली. तिने आपल्या दमदार अभिनयाने खूप नाव कमावलं. तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण नंतर वडिलांच्या विरोधात जाऊन तिने एक निर्णय घेतला, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला होता.

अमृता सिंहचे वडील आर्मी ऑफिसर होते. ती शीख कुटुंबातील होती. तिचा चित्रपटांशी काहीही संबंध नव्हता, पण अभिनयाची आवड असल्याने ती या क्षेत्रात आली. तिला पाहताच धर्मेंद्र यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली होती.

सैफशी लग्न अन् करिअरवर परिणाम

अमृता सिंहने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिच्यापेक्षा १२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता सैफ अली खानशी लग्न केलं आणि तिच्या करिअरला उतरती कळा लागली. सैफ व अमृताची भेट एका फोटोशूटसाठी झाली होती. दोघांच्या वयात १२ वर्षांचं अंतर होतं आणि १३ वर्षे संसार केल्यावर त्यांचा घटस्फोट झाला. अमृताने सारा व इब्राहिमचा सांभाळ करण्यात स्वतःला गुंतवून घेतलं आणि त्याचा परिणाम तिच्या फिल्मी करिअरवर झाला.

amrita singh saif ali khan
अमृता सिंह सैफ अली खान (फोटो – इंडियन एक्सप्रेस)

सैफशी लग्न करण्यापूर्वी अमृता तिच्या अफेअर्समुळे चर्चेत राहिली होती. तिचं नाव विनोद खन्ना यांच्याशी जोडलं गेलं. दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केले होते. दोघेही नात्यात असल्याचं बोललं जात होतं. अमृताच्या आईला मात्र हे नातं मंजूर नव्हतं, अशी चर्चा त्याकाळी झाली होती.

Story img Loader