गेल्यावर्षीपासूनच अक्षय कुमारच्या फिल्मी करीअरला जणू ग्रहणच लागलं आहे. अक्षयचे बरेच चित्रपट लागोपाठ फ्लॉप ठरले आहेत. नुकताच त्याचा आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. आता मात्र अक्षय कुमारच्या चित्रपटांमागे लागलेलं शुक्लकाष्ठ लवकरच संपणार आहे. ‘हेरा फेरी ३’मधूनही अक्षय कुमार बाहेर पडल्याची भरपूर चर्चा होती, पण नुकतंच ही बातमी खोडून काढत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अक्षयसह यामध्ये सुनील शेट्टी आणि परेश रावलही या नव्या भागात दिसणार आहेत.

आता या चित्रपटाबरोबरच अक्षय कुमारच्या आणखी एका सुपरहीट कॉमेडी चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा सुरू आहे. मीडिया रीपोर्टनुसार ‘हेरा फेरी ३’च्या बरोबरीनेच अक्षय कुमार त्याच्या ‘आवारा पागल दिवाना २’च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. विक्रम भट्ट दिग्दर्शित २००२ साली प्रदर्शित झालेला ‘आवारा पागल दिवाना’ हा चित्रपट तेव्हा चांगलाच गाजला होता. यात अक्षय कुमारसह परेश रावल, सुनील शेट्टी, आफताब, सुप्रिया पिळगांवकर, अमृता अरोरा हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. अॅक्शन आणि कॉमेडीचा डबल तडका असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

amruta Khanvilkar
‘३ इडियट्स’मध्ये करीना कपूर ऐवजी ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची झाली होती निवड; रोहन मापुस्कर म्हणाले, “मोठे स्टार…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Jaydeep Gauri
मालिका संपल्यावर १ महिन्यातच जयदीप-गौरीचं ‘स्टार प्रवाह’वर कमबॅक! कारण आहे खूपच खास…; दोघांचा डान्स Video व्हायरल
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
priyanka chopra 30 crore fee for movie
प्रियांका चोप्रा महेश बाबूच्या सिनेमातून करणार कमबॅक, पुनरागमनासाठी घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन; आलिया आणि दीपिकालाही टाकलं मागे
Maharashtrachi Hasya Jatra nikki tamboli
“मी कोकणात शिमग्याला जातेय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये भन्नाट स्किट सादर करणार निक्की तांबोळी, समोर आला प्रोमो
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
tharla tar mag wedding sequence who will arjun marry sayali or priya
‘ठरलं तर मग’ मालिकेत लगीनघाई! सायली अन् प्रिया दोघींच्या हातावर सजणार मेहंदी…; अर्जुनचं लग्न कोणाशी होणार?

आणखी वाचा : पुरस्कार सोहळ्यात पत्नी बोलणार इतक्यात ए आर रेहमान यांनी थांबवलं अन् म्हणाले, “हिंदीत नाही, तर…”

आता या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये आणखी दोन स्टार्सची एंट्री होणार आहे. पिंकव्हीलाच्या वृत्तानुसार या सीक्वलमध्ये संजय दत्त आणि अर्शद वारसीदेखील मुख्य भूमिकांमध्ये दिसू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा चित्रपट एक मल्टीस्टारर कॉमेडी अशा साच्यात सादर करायचा निर्मात्यांचा विचार आहे यासाठीच या दोन बड्या कलाकारांना या सीक्वलमध्ये घेण्याचा विचार सुरू आहे.

आणखी वाचा : राखी सावंत ‘Z Security’साठी घेणार पंतप्रधान मोदींची भेट; अभिनेत्री म्हणाली, “जर कंगनाला सुरक्षा…”

अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मीडिया रीपोर्टनुसार येत्या २ महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. यावर्षी चित्रीकरण पूर्ण करून पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करायचा निर्मात्यांचा विचार आहे. अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

Story img Loader