अभिनेता सलमान खान ‘बिग बॉस’ व ‘बिग बॉस ओटीटी’ होस्ट करत आहे. पण तुम्हाला ‘बिग बॉस’चा पहिला होस्ट सलमान खान नव्हता. तो तिसऱ्या पर्वापासून हा शो होस्ट करत आहे. ‘बिग बॉस’चे पहिले पर्व अभिनेता अर्शद वारसीने होस्ट केले होते, पण त्यानंतर तो पुन्हा या शोचा होस्ट म्हणून दिसला नाही. आता जवळपास दीड दशकांनी अर्शदने ‘बिग बॉस’ न होस्ट करण्यामागच्या कारणांचा खुलासा केला.

गर्लफ्रेंड घरातून पळून आली अन् ‘हा’ दिग्दर्शक लग्न करायला तयारच नव्हता, मग झालं असं काही की…

Bollywood actors Aamir Khan Reaction To Being Called A 60 Year Old Goes Viral
Video: “६० वर्षांचा झालास”, असं म्हणताच आमिर खान झाला नाराज, पापाराझीला टोला लगावत म्हणाला…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
hema malini laughed at ramdev baba
Video: गंगेत डुबकी मारणाऱ्या रामदेव बाबांनी केलं असं काही की…; हेमा मालिनींना हसू आवरेना
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”
Shashank Ketkar Welcomes Baby Girl
मुलगी झाली हो! शशांक केतकर दुसऱ्यांदा झाला बाबा, लेकीचं नाव ठेवलंय खूपच खास; म्हणाला, “घरात लक्ष्मी…”
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra share emotional birthday wish to sushant singh rajput
‘बिग बॉस १८’चा विजेता करणवीर मेहराला सुशांत सिंह राजपूतची आली आठवण, भावुक पोस्ट करत म्हणाला…
vivian dsena first reaction after karenveer mehra won bigg boss 18
करणवीर मेहरा Bigg Boss 18 चा विजेता ठरल्यावर विवियन डिसेनाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “त्याच्या…”
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra Talk About Sidharth Shukla
“मनाने खूप मोठा माणूस…”, सिद्धार्थ शुक्लाशी तुलना करण्यावरून करणवीर मेहराचं वक्तव्य; जुनी आठवण सांगत म्हणाला, “त्याची महागडी बाईक…”

‘अमर उजाला’शी बोलताना अर्शदने ‘बिग बॉस’ होस्ट न करणे आणि जॉली ‘एलएलबी २’ मध्ये मुख्य भूमिका न करण्याबद्दल उत्तर दिले. दोन्ही प्रोजेक्ट्स हिट झाले, पण अर्शद दोन्ही दिसला नाही. अर्शदची जागा ‘बिग बॉस’मध्ये सलमान खानने घेतली होती, तर अक्षयने ‘जॉली एलएलबी २’ मध्ये त्याची जागा घेतली होती.

Video: बंडानंतर अमोल कोल्हे पडले सुधीर मुनगंटीवारांच्या पाया; तर दिलीप वळसेंना पाहताच भाजपा नेते म्हणाले, “देवेंद्रजींनी…”

“आता जॉली एलएलबी ३ बनत आहे, ज्यामध्ये मी आणि अक्षय दोघेही आहोत. हाच ओरिजनल प्लॅन होता. मी पहिला भाग करेन आणि तो दुसरा करेल. बिग बॉसबद्दल बोलायचं झाल्यास मी पुढचे सीझन करू शकलो नाही कारण मला शूटिंगसाठी लंडनला जावं लागलं होतं. पण आता मला वाटतं की सलमान या शोसाठी परफेक्ट होस्ट आहे. सलमानसारखं इतर कुणीच हा शो कोणी होस्ट करू शकत नाही. या रिअॅलिटी शोला सलमानसारख्या दबंग होस्टची गरज आहे,” असं अर्शद म्हणाला.

अर्शदने सांगितलं की, तो ‘हलचल’ चित्रपटात कमा करून खूश नव्हता. या चित्रपटात अक्षय खन्ना, करीना कपूर, जॅकी श्रॉफ, परेश रावल, अरबाज खान, सुनील शेट्टी सारखे कलाकार होते आणि प्रियदर्शनने दिग्दर्शित केला होता. “खरं सांगायचं झाल्यास मला हलचल चित्रपटात काम करायला आवडलं नव्हतं. अभिनय हा माझा व्यवसाय आहे आणि त्यामुळेच मी तो चित्रपट केला. वैयक्तिकरित्या मी या चित्रपटावर खूश नव्हते. मी फक्त माझे काम केले. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी चांगल्या नसतात,” असं अर्शद म्हणाला.

Story img Loader