बॉलिवूडचा सर्किट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अरशद वारसी सध्या ‘असुर २’ या वेब सीरिजमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सीरिजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. १९९७ साली ‘तेरे मेरे सपने’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदापर्ण कऱणाऱ्या अरशदने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. असं असूनही अरशद अजूनही स्वत:ला इंडस्ट्री भाग मानत नाही. एका मुलाखतीत अरशदने यामागचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- गर्लफ्रेंड घरातून पळून आली अन् ‘हा’ दिग्दर्शक लग्न करायला तयारच नव्हता, मग झालं असं काही की…

अर्शद म्हणाला की, “मी अभिनयातून जे पैसे कमावतो ते केवळ उपउत्पादन असते. पण मला पैशाची भूक नाही, तर कौतुकाची भूक आहे. जर कोणी माझ्या व्यक्तिरेखेला पसंती देत ​​असेल आणि त्याचे कौतुक करत असेल तर ती गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. पण मी आत्तापर्यंतचा माझ्या चित्रपटाचा आलेख पाहिला तर लोकांनी माझी पात्रे पसंत केली आहेत. जेव्हा माझा एखादा चित्रपट किंवा वेब सीरिज लोकांच्या पसंतीस उतरते ही माझ्यासाठी जगातील सर्वोत्तम भावना असते.”

अर्शद पुढे म्हणाला, “जेव्हा मी एखादा फ्लॉप चित्रपट देतो तेव्हा पुन्हा इंडस्ट्रीत स्वत:साठी स्थान निर्माण करणे माझ्यासाठी अवघड होऊन बसते. हा प्रवास माझ्यासाठी चढ-उतारांनी भरलेला आहे. मी गेल्या २७ वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत आहे. पण आजही मी हे सांगतो की मी स्वतःला इंडस्ट्रीचा भाग मानत नाही.”

हेही वाचा- सकीना-तारा सिंहच्या लव्ह स्टोरीमध्ये नाना पाटेकरांची दमदार एंट्री, दिसणार ‘या’ भूमिकेत

अर्शदने ‘हासिल’, ‘गोलमाल सीरिज’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जॉली एलएलबी’अशा वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं आहे. मुन्नाभाईमधील त्याची सर्किटची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच ‘जॉली एलएलबी’मध्ये त्याने साकारलेल्या वकिलाच्या भूमिकेचेही कौतुक करण्यात आले होते.

हेही वाचा- Video : “मी मुलगा असते तर बरं झालं असतं”; प्रियांका चोप्राचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

अरशदच्या वक्रफ्रंटबाबत बोलायच झालं तर त्याची ‘असुर’ वेबसिरीजचा दूसरा सीझन नुकताच ‘जिओ सिनेमा’वर प्रदर्शित झाला आहे. या वेबसिरीजचा पहिला भाग २०२० साली लॉकडाउनच्या दरम्यान प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या बेवसिरीजच्या पहिल्या भागाल अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तेव्हापासून याच्या दुसऱ्या सीझनची लोक आतुरतेने वाट बघत होते, अखेर जून २०२३ मध्ये याचा दुसरा भागही प्रदर्शित कऱण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arshad warsi says he still thinks he is not part of bollywood industry dpj