रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. त्यानंतर अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जबरदस्त कमाई करत आहे. चित्रपटाने जगभरात ८०० कोटींहून अधिक तर भारतात ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

चित्रपटावर बरीच टीका होत आहे, चित्रपटसृष्टीतील काही सेलिब्रिटीजनीदेखील यावर टीका केली असून काहींनी याचं कौतुक केलं आहे. मध्यंतरी अर्शद वारसीनेदेखील या चित्रपटाचं आणि खासकरून रणबीरच्या कामाचं कौतुक केलं होतं. पण नुकतंच एका मुलाखतीमध्ये स्वतः मात्र या किंवा अशा चित्रपटामध्ये काम करण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो

काही गोष्टी आपल्याला पाहायला आवडतात पण आपण त्या करू शकत नाही अशा प्रकारात अर्शद वारसीने ‘अ‍ॅनिमल’चा समावेश केला आहे. बॉलिवूड हंगामाशी संवाद साधतांना अर्शद म्हणाला, “जेव्हा मला इंद्र कुमारने ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटासाठी विचारलं तेव्हा मी नकार दिला. मला अशा प्रकारचे सेक्स कॉमेडी असलेले चित्रपट फार आवडत नाही, ते बघायला माझी काहीच ना नाही, ते मजेशीर असतात पण मी तसे चित्रपट करू इच्छित नाही. एक प्रेक्षक म्हणून मी ते चित्रपट आनंदाने पाहू शकतो पण एक अभिनेता म्हणून मी तो चित्रपट करू शकत नाही. जसं मला पॉर्न बघायला आवडतं पण त्यात काम करायला नाही, अगदी तशीच ही गोष्ट आहे.”

आणखी वाचा : संदीप रेड्डी वांगांच्या पहिल्या चित्रपटासाठी कुटुंबाने विकली शेतजमीन तर भावाने सोडली नोकरी; ‘अ‍ॅनिमल’फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा

त्यामुळे भविष्यात संदीप रेड्डी वांगाबरोबर ‘अ‍ॅनिमल’सारख्या चित्रपटात अर्शद वारसी दिसणं हे जवळजवळ अशक्यच आहे. नुकतीच अर्शद आणि संजय दत्त यांच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाला २० वर्षं पूर्ण झाली आहेत. याच चित्रपटाने अर्शदला खरी ओळख मिळवून दिली. चाहते मुन्नाभाई आणि सर्किट या जोडीला पुन्हा तिसऱ्या भागात धमाल करताना पाहू इच्छित आहेत. लवकरच प्रेक्षकांची ही इच्छाही पूर्ण होऊ शकते असंही अर्शदने या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

Story img Loader