‘झलक दिखला जा’ या सेलिब्रिटी डान्स रिअॅलिटी शोच्या ११ व्या पर्वाचा परीक्षक व सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीने पत्नीला लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली आहे. अभिनेत्याने २५ वर्षांनी लग्नाची नोंदणी केली आहे. याबाबत अर्शदने स्वतः माहिती शेअर केली आहे.
अर्शदचं लग्न मारिया गोरेट्टीशी झालं आहे. त्यांच्या लग्नाला व्हॅलेंटाइन डेला २५ वर्षे पूर्ण होतील. अर्शद आणि मारियाचे लग्न १४ फेब्रुवारी १९९९ रोजी झाले होते. विशेष बाब म्हणजे अर्शद आणि मारिया यांनी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर लग्न केले. आता लग्नाच्या २५ वर्षांनंतर दोघांनी एकमेकांना खास भेट दिली आहे.
अर्शद वारसी आणि मारिया यांनी २३ जानेवारीला लग्नाची नोंदणी केली. नोंदणीकृत झाला. “मला याबद्दल कधी डोक्यात विचारच आला नाही आणि त्याची गरजही वाटली नाही. मात्र, मालमत्ता खरेदी करताना हे खूप महत्त्वाचं असल्याचं माझ्या लक्षात आलं. तसेच दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर त्यावेळी लग्नाची नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे. आम्ही हे कायद्यासाठी केलं आहे. नाहीतर मला एक जोडीदार म्हणून असं वाटतं की तुम्ही एकमेकांशी बांधील असणं जास्त महत्त्वाचं आहे,” असं अर्शद वारसी ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाला.
प्रसिद्ध अभिनेत्रीने गुजराती बिझनेसमनशी गोव्यात बांधली लग्नगाठ, भर मंडपात केलं लिपलॉक, Photos चर्चेत
यावेळी अर्शदने त्याच्या लग्नाच्या तारखेची लाज वाटत असल्याचं “मला माझ्या लग्नाची तारीख सांगायला आवडत नाही कारण ते खूप विचित्र वाटतं. मारिया आणि मला दोघांनाही लाज वाटते. आम्ही जाणूनबुजून व्हॅलेंटाइन डेला लग्न केलं नव्हतं,” असं अर्शद म्हणाला.