Govinda Sunita Ahuja : गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा लग्नाच्या ३७ वर्षानंतर वेगळे होत असल्याच्या चर्चा होत आहेत. सुनीताच्या मागील काही मुलाखतींवरून या दोघांच्या नात्यात बिनसलंय, असं म्हटलं जात होतं. याचदरम्यान, गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीशी अफेअर असल्याने सुनीताने घटस्फोट घ्यायचं ठरवलं आहे, अशा बातम्या येत आहेत. गोविंदाच्या मॅनेजरने यावर प्रतिक्रिया देत या दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नसल्याचं म्हटलं आहे. तसेच गोविंदाचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेकनेदेखील मामा-मामीच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इ टाइम्सच्या वृत्तानुसार, सुनीताने काही महिन्यांपूर्वी गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली. याबद्दल गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा म्हणाले, “कुटुंबातील काही सदस्यांनी केलेल्या काही विधानांमुळे या जोडप्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. आणखी काही नाही. तसेच गोविंदा लवकरच एक चित्रपट सुरू करणार आहे आणि त्यासाठी कलाकार आमच्या ऑफिसला भेट देत आहेत.”

त्या दोघांचा घटस्फोट शक्यच नाही, असं गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकने या घटस्फोटाच्या चर्चांवर सांगितलं. “शक्य नाही. ते दोघेही कधीच असं करणार नाहीत,” असं कृष्णा म्हणाला.

गोविंदाची भाची आरती सिंह हिने न्यूज18 शी बोलताना प्रतिक्रिया दिली आणि या अफवा असल्याचं सांगितलं. “मी सध्या मुंबईत नाही त्यामुळे मी कोणाशीही संपर्क करू शकले नाही. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ही खोटी बातमी आहे. हे फक्त अंदाज आहेत कारण त्यांचं नातं खूप मजबूत आहे. त्यांनी इतक्या वर्षांमध्ये एक मजबूत आणि प्रेमळ नातं निर्माण केले आहे; मग ते घटस्फोट कसे घेऊ शकतात? मला माहीत नाही की अशा सर्व अफवा कुठून येतात, हे पूर्णपणे खोटं आहे. लोकांनी इतरांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चुकीची माहिती पसरवू नये. खरं तर माझ्या घटस्फोटाच्या बातम्याही विनाकारण पसरल्या होत्या. अशा निराधार चर्चा नात्यांमध्ये तणाव निर्माण करतात,” असं आरती म्हणाली.

दरम्यान, सुनीता आहुजाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत गोविंदाबरोबर राहत नसल्याचं सांगितलं होतं. गोविंदा बंगल्यात राहतो, तर सुनीता मुलगी टीना व मुलगा यशवर्धनबरोबर फ्लॅटमध्ये राहते. “मी आमच्या लग्नात पूर्वी खूप सुरक्षित होते, आता नाही,” असं ती हसत म्हणाली होती. “आधी मला काहीच फरक पडत नव्हता. पण आता त्याचे वय ६० पेक्षा जास्त झाले आहे, त्यामुळे मला भीती वाटते. जेव्हा तो तरुण होता तेव्हा तो इतका काम करायचा की त्याच्याकडे अफेअर्ससाठी वेळ नव्हता पण आता मला भीती वाटतं की रिकामा वेळ आहे तर काही करायला नको,” असं सुनीताने म्हटलं होतं.