ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांच्या निधानंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. नेहमीच हसतमुख आणि आपल्या तत्त्वांनुसार चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अरुण बाली आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम असणार आहेत. अरुण बाली यांचा एक व्हिडीओ काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियावर चर्चेत होता. ज्यात त्यांनी कलाकार आणि त्यांचं जीवन कसं असतं यावर भाष्य केलं होतं. या व्हिडीओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील साधेपणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता अरुण बाली निधनानंतर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होताना दिसत आहे.

अरुण बाली यांच्या निधनानंतर त्यांचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये अरुण बाली यांचा उत्साह तरुणालाही लाजवेल असाच आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांचे चाहते खूप भावुक झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी भावुक कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा- Arun Bali Passes Away : सुप्रसिद्ध अभिनेते अरुण बाली यांचा शेवटचा चित्रपट आजच प्रदर्शित, साकारली महत्त्वपूर्ण भूमिका

अभिनेत्री असीमा भट्ट यांच्या युट्यूबवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अरुण बाली बिनधास्तपणे आपलं म्हणणं मांडताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये असीमा त्यांच्याशी कलाकारांच्या वागणुकीबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला असीमा त्यांना विचारते, “तुम्हाला माझं नाव माहीत आहे का?” त्यावर अरुण बाली मजेदार अंदाजात उत्तर देतात, “हो, मला लोक सांगतात की तू खूप चांगली कलाकार आहेस पण थोडी हेखेखोर आहेस.”

या व्हिडीओमध्ये असीमा पुढे म्हणते, “मी काही हेखेखोर नाही.” त्यावर अरुण बाली तिला म्हणतात, “हा तुझा बोलण्याचा एक अंदाज आहे. पण असा कोणताच कलाकार नाही जो एक हेखेखोर नाही. मी एका ओपेरामध्ये ‘चित्रलेखा’ करत होतो. यात एडिटिंगच्या वेळी अभिनेत्रीचे संवाद कापले गेले नाहीत पण माझे काही संवाद काढून टाकण्यात आले. जेव्हा मी याचा जाब विचारला तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही आजही हेखेखोर आहात.” या व्हिडीओमध्ये अरुण बाली यांच्या म्हणण्याचा अर्थ होता कलाकाराने सेन्सिटिव्ह असणं चुकीचं नाही. या संपूर्ण व्हिडीओमध्ये त्यांचा हसमुख चेहरा सर्वाचं लक्ष वेधून घेतोय.

Story img Loader