ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अरुणा यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकाही प्रचंड गाजल्या. कामाबरोबरच त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत राहिल्या. अरुणा यांनी विवाहित पुरुषाशी लग्न केलं. पण त्यांनी याबाबत कधीच खुलेपणाने भाष्य केलं नाही. पण बऱ्याच वर्षांनंतर अरुणा यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – विवाहित दिग्दर्शकावर जडलं होतं प्रेम, दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पत्नीने उर्मिला मातोंडकरच्या कानाखाली मारली अन्…

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अरुणा यांचं नाव अभिनेते महमूद यांच्यांशी जोडलं गेलं. पण त्यावेळी महमूद यांचं आधीच लग्न झालं होतं. त्यानंतर अरुणा व दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. कुकू यांच्याशी अरुणा यांनी लग्न केलं. पण त्यावेळी कुकू यांचंही आधीच लग्न झालं होतं.

एएनआईला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरुणा म्हणाल्या, “जेव्हा तुम्ही आधीच लग्न झालेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेता तेव्हा सगळंच खूप कठीण असतं. माझं लग्न आधीच लग्न झालेल्या एका व्यक्तीबरोबर झालं आहे. मी लग्न केलं होतं. पण माझं लग्न झालं आहे हे कोणाला माहित नव्हतं. एक वर्षापूर्वी कुकूच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं. म्हणूनच मी आता हिंमतीने याबाबत बोलत आहे.”

आणखी वाचा – Bigg Boss 16 : मराठमोळा शिव ठाकरे ग्रँड फिनालेपूर्वीच घराबाहेर पडणार? ‘तो’ व्हायरल व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भडकले

“पण याआधी मी कधीच याविषयी भाष्य केलं नाही. कारण मला कोणाचं मन दुखवायचं नव्हतं. पहिल्यांदा मी कुकू कोहलीबाबत बोलत आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीला माहित होतं की मी कुकू कोहली यांच्याबरोबर आहे. पत्रकारांनाही ही गोष्ट माहित होती. एका स्त्रीसाठी विवाहित पुरुषाबरोबर लग्न करणं सोप नसतं. माझं याआधी कोणतंच नातं नव्हतं. म्हणून मला मुलंही नाहीत.” अरुणा यांनी लग्नाच्या ३२ वर्षांनंतर खासगी आयुष्याबाबत खुलासा केला आहे.