बॉलिवूड पार्टी आणि कलाकार यांची चर्चा कायमच होते. नुकतीच बॉलिवूड कलाकारांनी आपल्याला घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. महत्वाचे म्हणजे आता या पार्ट्याना स्टार किड्सदेखील हजेरी लावत आहेत. दिवाळी पार्टीनंतर आता स्टार किड्सनी हॅलोवीन पार्टीला हजेरी लावली होती. नुकतेच याचे फोटो. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी रात्री या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला आर्यन खान, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि इतर बॉलिवूड सेलिब्रेटी हजर होते. ओरहान अवत्रामणी यांनी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतला आर्यन खानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात त्याने काळ्या रंगांचे कपडे परिधान केले आहेत आणि चंदेरी जॅकेट त्यावर घातले आहे. पार्टीतील खास त्याने डोळ्यांचा विशिष्ट लूक केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचे रक्षक त्याला सुरक्षित नेत आहेत तर पापाराझी त्याचे फोटो काढण्यात दंग आहेत.

चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांनी ‘या’ कारणासाठी दिला होता ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटाला होकार

हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कॉमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे ‘फोटोग्राफर मंडळींना थोडा तरी आदर दाखव’, तर एकाने लिहले आहे ‘याला एवढी विनंती करण्याची गरज नाही’. काहींनी लिहले आहे ‘याला खूपच माज आलेला दिसतोय’. ‘वडिलांच्या पैशावर माज दाखवतोय’ असेही खाजण म्हणाले आहेत. काहीजणांनी तर त्याची तुलना त्याच्या वडिलांशी म्हणजे ‘शाहरुख खानशी ‘केली आहे. ‘रईस’ चित्रपटातील शाहरुख खानचा लूक आणि आर्यनचा हा लूक एकच आहेत असं नेटकरी म्हणत आहेत.

आर्यन खान मागच्यावर्षीपासून चर्चेत आहेत. ड्रग्सपार्टी प्रकरणामुळे त्याला काही दिवस तुरुंगवास भोगावा लागला होता. मात्र त्याला आता या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली आहे. मुंबईहून गोवा जाणाऱ्या क्रूजवरून आर्यन खानला ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (NCB) ऑक्टोबर २०२१ मध्ये अटक केली होती. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडल्याचा आरोप या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी केला होता.