किंग खान शाहरुखचा लेक आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. आर्यनचं नाव अभिनेत्री नोरा फतेहीशी जोडलं गेलं आहे. नोरा फतेही व आर्यन खानच्या फातिमा राजा या मैत्रिणीने दुबईतील त्यांचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंवरून या दोघांच्या रिलेशनशिपच्या जोरदार चर्चा रंगू लागल्या. दरम्यान आता आर्यनाचा पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबरचा फोटो व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : आईचे स्तन दिसू नये म्हणून लेकीने केलं असं काही की अभिनेत्री-मॉडेल झाली ट्रोल, ट्रोलर्सला उत्तर देत म्हणाली, “माझ्या स्तनांमुळे…”

पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान व आर्यनचा एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या फोटोमध्ये आर्यनने पांढऱ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं असल्याचं दिसत आहे. तर सादिया व आर्यनने अगदी एकमेकांच्या जवळ उभं राहून हा फोटो क्लिक केला असल्याचं दिसत आहे.
आर्यन व सादियाचा हा फोटो नेमका कुठचा व कधीचा आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पण नोरा की सादिया आर्यन नक्की कोणाला डेट करतोय अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. या फोटोमध्ये सादियाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. तर आर्यननेही या फोटोसाठी पोझ दिली आहे.

कोण आहे सादिया खान?
मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम काम करत पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या ११ वर्षांपासून ती कलाक्षेत्रात कार्यरत आहे. ‘खुदा और मोहब्बत’ या शोमुळे ती नावारुपाला आली. त्यानंतर सादियाने ‘खुदा और मोहब्बत २’, ‘शायद’, ‘मार्यम पेरिरा’, ‘अब्दुलाह द फाइनल विटनेस’ अशा अनेक शोमध्ये काम केलं.

आणखी वाचा – शहरातलं घर सोडून महाबळेश्वरमध्ये राहतेय सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, फोटो शेअर करत सांगितलं कसं जगतेय आयुष्य?

नोरा नव्हे तर सादिया व आर्यन एकमेकांना डेट करत आहेत का? अशा नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आर्यन बॉलिवूड पदार्पणसाठी सज्ज आहे. लवकरच तो दिग्दर्शकाच्या भूमिकेतून बॉलिवूडमधील त्याच्या करिअरला सुरुवात करेल. नोरा फतेही ‘१०० पर्संट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aryan khan dating rumours with nora fatehi his photos with pakistani actress sadia khan goes viral on social media kmd