अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. २९ मे ते १ जूनदरम्यान पार पडलेल्या या चार दिवसीय सोहळ्यानंतर आता सलमान खान, रणबीर कपूर-आलिया भट्ट आणि अनेक बॉलीवूड कलाकार भारतात परतले आहेत. आता शाहरुख खान त्याच्या पत्नी आणि मुलांसह मुंबई विमानतळावर परतताना दिसला.
आज (३ जून रोजी) शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम मुंबईत परतले. कारमध्ये बसताना खान कुटुंबाने छत्रीने आपला चेहरा झाकला. दरम्यान, पापाराझींनी त्यांचे व्हिडीओ आणि फोटो काढले. किंग खानचा आणि त्याच्या कुटुंबाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
तसंच लवकरच बाबा होणारा अभिनेता रणवीर सिंगदेखील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या भव्य प्री-वेडिंग सोहळ्यावरून भारतात परतला आहे. एअरपोर्ट लूकसाठी रणवीरने काळ्या रंगाचं जॅकेट, सफेद शर्ट, मॅचिंग पँट आणि हॅटची निवड केली होती.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा पहिला प्री-वेडिंग सोहळा मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. या सोहळ्याला जगभरातील बड्या मंडळींनी हजेरी लावली होती. आता या कपलचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा युरोपमध्ये पार पडला. सोहळ्याची सुरुवात २९ मे रोजी झाली आणि १ जून रोजी समारोप झाला. हा प्री-वेडिंग सोहळा इटली आणि फ्रान्समध्ये लक्झरी क्रूझ जहाजावर आयोजित करण्यात आला होता.
सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर-आलिया भट्ट, जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया , शनाया कपूर, इब्राहिम अली खान, सारा अली खानसह बर्याच बॉलीवूड सेलिब्रिटींनी या भव्य सोहळ्याला हजेरी लावली होती.
शिवाय कॅटी पेरी, पिटबुल, एंड्रिया बोसेली आणि पंजाबी गायक गुरु रंधावा यांसारख्या जगप्रसिद्ध गायकांनी आपल्या परफॉर्मन्सने सोहळ्याची शोभा वाढवली.
हेही वाचा… अर्जुन कपूरशी ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन; म्हणाली, “नाही, या सगळ्या…”
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये अनंत-राधिकाचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे.