बॉलिवूडमधील नेपोटीजमबद्दल बरीच चर्चा सोशल मीडियावर होत असते. गेली काही वर्षं याबद्दल बरंच काही बोललं आणि लिहिलं गेलं आहे. अनेक स्टारकिड्सनी आतापर्यंत आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे. तर आताही काही आगामी चित्रपटातून लोकप्रिय स्टारकिड्स मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. या स्टारकिड्सना चित्रपट देणारं महत्वाचं नाव म्हणजे करण जोहर. परंतु शाहरुख खानच्या लेकाने करणला मोठा धक्का दिला आहे.

निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याने आतापर्यंत अनेक स्टारकिड्सना लॉंच केलं आहे. करण त्याच्या धर्मा प्रोडक्शन्सच्या मध्यमातून अनेक स्टारकिड्सना संधी दिली आहे. आगामी काळातही तो काही स्टार्सच्या मुलांना चित्रपटात प्रमुख भूमिका देणार आहे.

when udit narayan kissed shreya ghoshal
Video: उदित नारायण यांनी श्रेया घोषालला भर मंचावर केलेलं किस; गायिकेची प्रतिक्रिया झालेली व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
sequel of Ghajini film Allu Arvind Aamir khan
‘गजनी’चा सिक्वेल येणार ? ‘तंडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच निमित्ताने अल्लू अरविंद आणि आमिर यांची भेट; महत्वाची अपडेट आली समोर. . .
star pravah parivaar puraskar ceremony 2025
तारीख ठरली! ‘स्टार प्रवाह’ने केली पुरस्कार सोहळ्याची घोषणा, यंदा कोणती मालिका मारणार बाजी? नेटकरी म्हणाले…
Father struggles to save 9-year-old daughter from tiger father daughter bond video viral on social media
शेवटी बाप हा बापच असतो! ९ वर्षाच्या मुलीला वाघापासून वाचवण्यासाठी बापाची धडपड, VIDEO पाहून काळजात भरेल धडकी
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
udayanraje Bhosle called chhava director laxman utekar
‘छावा’तील ‘ती’ दृश्ये बदलणार? उदयनराजेंनी थेट फोन केल्यावर दिग्दर्शक म्हणाले, “चित्रपटामध्ये फक्त आपले राजे…”
Marathi Actor Abhishek Rahalkar Wedding
आधी गुपचूप साखरपुडा, आता लग्नाचा फोटो आला समोर! मराठी अभिनेता अडकला विवाहबंधनात, ‘स्टार प्रवाह’च्या ‘या’ मालिकेत केलंय काम

आणखी वाचा : Shraddha Murder Case : “आफताबला फाशीच झाली पाहिजे, कारण…”; FIR फेम अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला त्याच्या चित्रपटातून लॉंच करायचा दिग्दर्शक करण जोहरचा विचार होता. करणने आर्यनला एका चित्रपटासाठी ऑफरही दिली होती. परंतु आर्यनने करणच्या त्या ऑफरला नकार दिला. सुरुवातीला करणला वाटले की, आर्यन आत्ता ऑफर नाकारत आहे पण नंतर तो होकार देईल. त्यामुळे करणने अनेकदा आर्यनला या चित्रपटाबद्दल विचारले. परंतु प्रत्येकवेळी आर्यनने करणची ऑफर धुडकावून लावली.

हेही वाचा : बालदिनाच्या दिवशी करण जोहर घेऊन आला लोकप्रिय ‘डिस्को दिवाने’ गाण्याचं नवीन व्हर्जन, व्हिडीओ व्हायरल

फक्त करण जोहरच नाही तर झोया अख्तरनेही आर्यनला एक ऑफर देऊ केली होती. मात्र आर्यनने त्या ऑफरलाही नकार दिला. शाहरुख खानच्या मुलाला अभिनय नाही तर दिग्दर्शनात करिअर करायचं आहे. आर्यनला ऑन स्क्रीन अभिनय करण्यात काहीही रस नाही, हे आता त्याने सिद्ध केलं आहे. आर्यन खानकडून सारखा मिळणार नकार बघून करण जोहरनेही आर्यनला चित्रपटाबद्दल विचारणं बंद केलं आहे. त्यामुळे शाहरुखनंतर आता त्याची मुलगी सुहानाच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणारी ठरेल.

Story img Loader