बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कायमच चर्चेत असतो. शाहरुखप्रमाणे त्याचाही चाहतावर्ग मोठा आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याला बऱ्याच वेळा त्याच्या वागण्यावरून ट्रोलही केले जाते. मात्र, सध्या आर्यन एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आर्यनने दिग्दर्शन क्षेत्रात पहिले पाऊल टाकले आहे. आर्यनने एक जाहिरात दिग्दर्शित केली आहे. या जाहिरातीत शाहरुख खानने अभिनय केला आहे. वडिलांबरोबर काम करण्याचा अनुभव नेमका कसा होता याबाबत आर्यनने खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- जिया खान प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर सूरज पांचोलीने सलमान खानला केला होता मेसेज, म्हणाला..

आर्यन खान म्हणाला की, वडिलांसोबत काम करणे माझ्यासाठी फार काही अवघड नक्कीच नव्हते. त्याचे कारणही तेवढेच मोठा आहे. त्यांनी (शाहरुख खान) आपल्या अनुभवाने आणि समर्पणाने सेटवर प्रत्येकाचे काम सोपे केले. जेव्हा ते सेटवर काम करतात, तेव्हा सेटवरील प्रत्येक व्यक्तीला छान वाटते. येणारे इनपुट ही सर्वांची मेहनत असते. त्यामुळे सेटवर सर्वांचे ऐकले पाहिजे, असेही आर्यन म्हणाला.

हेही वाचा- Video : “तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या कोणती?” जिनिलीयाच्या प्रश्नावर रितेश देशमुखने केलं असं काही…; व्हिडीओ व्हायरल

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली होती. शाहरुखच्या कारकिर्दीतील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ‘पठाण’ चित्रपटाद्वारे शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. ‘पठाण’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शाहरुखने ‘जवान’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी ‘जवान’ चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान याचा ‘जवान’ चित्रपटातील लूकदेखील समोर आला होता. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.