अभिनेता मनोज बाजपेयीचा आगामी चित्रपट ‘सिर्फ एक बंदा काफी है’चा जबरदस्त आणि दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. OTT वर प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे वर्णन सत्य घटनांनी प्रेरित मूळ चित्रपट असे केले जात आहे. अपूर्व सिंग कार्की यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा कोर्टरूम ड्रामा चित्रपट आता कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे.
हेही वाचा- “लग्नाला बोलवणार का?” पापाराझींच्या प्रश्नावर राघव-परिणीती म्हणाले…
आसाराम बापू ट्रस्टने चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी या चित्रपटाची कथा आसाराम बापूंची कथा असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. तो पोक्सो (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्स) कायद्यांतर्गत एका अल्पवयीन मुलीची केस लढत आहे. जिच्यावर एका भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा एक खटला मनोज एकट्याने लढत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्याची या प्रकरणात दोषीला शिक्षा मिळवून देण्यासाठीची चाललेली धडपड दाखवण्यात आली आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरवरून असे दिसून येते की हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनांपासून प्रेरित आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटातील गॉडमॅन दुसरा कोणी नसून आसाराम बापू आहे, असा अंदाज लावण्यात येत आहे. कारण मनोज हा पी. सी. सोलंकी याची भूमिका साकारत आहे. पी. सी. सोलंकी तोच वकील आहे ज्याने आसारामविरुद्ध खटला लढवला आणि त्यांना तुरुंगात पाठवले.
हेही वाचा- ‘आदिपुरुष’चा ट्रेलर पाहताना क्रितीच्या ‘त्या’ कृतीने वेधले सर्वांचे लक्ष, व्हिडीओ व्हायरल
आता आसाराम बापूंच्या चॅरिटेबल ट्रस्टने मंगळवारी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामध्ये चित्रपटाच्या प्रमोशन आणि रिलीजवर बंदी घालण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. हा चित्रपट आक्षेपार्ह आणि त्यांच्या अशिलाची बदनामी करणारा आहे आणि त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा मलिन होऊ शकते. तसेच त्यांच्या भक्तांच्या आणि अनुयायांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, अशी बाजू आसाराम बापू ट्रस्टच्या वकिलांनी मांडली आहे.