सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिचा आजीबरोबरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जनाईने आजीबरोबर एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. जनाईला पाहून नेटकरी तिच्या सौंदर्याचं खूप कौतुक करत आहेत. काहींनी तर तिची तुलना बॉलीवूड अभिनेत्रींशी केली आहे.

जनाई ही आशा भोसले यांचे पूत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे. ती उत्तम गायिकादेखील आहे. एका मराठी चित्रपटाच्या प्रिमिअरला जनाईने आजी आशा भोसले यांच्याबरोबर हजेरी लावली होती. यावेळी तिने आजीबरोबर छान पोज दिल्या. जनाईने आजीप्रमाणेच सुंदरशी साडी नेसली होती आणि केस मोकळे सोडले होते. तिचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिचं खूप कौतुक केलं आहे.

Video: नुपूर शिखरेला लग्नात शॉर्ट्स अन् बनियनवर पाहून आयरा खान म्हणाली, “Good Bye…”

काही नेटकऱ्यांनी जनाई काजोलसारखी दिसते असं म्हटलंय. तर काहींनी ती काजोल व ऐश्वर्या राय दोघींसारखी दिसत असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत.

Zanai Bhosle
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
Zanai Bhosle
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, जनाई सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इन्स्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा आजी आशा भोसले यांच्याबरोबरचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.