बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले. बॉलिवूडचे व्हिलन अशी ओळख असलेले आशिष विद्यार्थी यांनी ६०व्या वर्षी पुन्हा एकदा बोहल्यावर चढले आहेत. आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. आशिष विद्यार्थी यांच्या लग्नानंतर त्यांची पहिली पत्नी राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिने एक पोस्ट शेअर करत याबद्दल मत मांडले आहे.

आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी राजोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे ती सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यात चढ-उतारांचा सामना करत असल्याचे दिसत आहे. तिने केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
आणखी वाचा : “कपाळावर आठ्या पाडून महाराजांची भूमिका साकारणारे…” ‘रावरंभा’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठमोळ्या दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

राजोशीने दोन क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या आहेत. “एखादी योग्य व्यक्ती तुम्हाला कधीच तुम्ही त्याच्यासाठी काय आहात, हा प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला त्रास होईल, असं तो कधीच वागणार नाही. हे कायम लक्षात ठेवा”, असे तिने केलेल्या पहिल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.”

ashish vidyarthi first wife post 1
आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीची पोस्ट

आणखी वाचा : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात, फोटो व्हायरल

“कदाचित आता अतिविचार आणि संशय या गोष्टी तुमच्या मनातून निघून गेल्या असतील. तुमच्या मनात गोंधळाऐवजी स्पष्टता असेल. तुमचे जीवन शांती आणि संयमाने भरलेले असेल. तुम्ही बऱ्याच काळापासून खूप खंबीर असाल आणि आता तुम्हाला आशीर्वाद मिळण्याची वेळ आली आहे. कारण तुम्ही त्यासाठी पात्र आहात”, असे तिने दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ashish vidyarthi first wife post
आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीची पोस्ट

आशिष विद्यार्थी यांनी लग्न केल्यानंतर राजोशीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी हसतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. “जीवनाच्या कोड्यात अडकू नका, हे जीवन आहे”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेची पत्नी ‘या’ क्षेत्रात करते काम, जाणून घ्या तिच्याबद्दल…

दरम्यान राजोशीच्या इन्स्टाग्राम पोस्टची सध्या चर्चा रंगली आहे. आशिष आणि त्यांची पहिली पत्नी राजोशी यांना २३ वर्षांचा मुलगा आहे. तर आशिषची दुसरी पत्नी गुवाहाटी येथील रहिवासी असून ती व्यवसायिक आहे. ती कोलकात्यात एक अपस्केल फॅशन स्टोअर चालवते.

Story img Loader