अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी कोलकाता येथील फॅशन उद्योजक रुपाली बरुआ हिच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नानंतर या जोडप्याला टीका आणि समर्थन दोन्हीचा सामना करावा लागला. लग्नानंतर आलेल्या नकारात्मकतेबद्दल पहिल्यांदाच रुपालीने भाष्य केलं आहे. तसेच लग्नाआधी आपण आशिषच्या मुलाची भेट घेतल्याचंही तिने सांगितलं.
दीपिका पदुकोणने शाहरुख खानला किस करतानाचा फोटो केला शेअर, पती रणवीर सिंहच्या कमेंटने वेधलं लक्ष
रुपाली नकारात्मक कमेंट्सबद्दल म्हणाली, “मी त्या लोकांना ओळखत नाही म्हणून मी त्याचा विचारच केला नाही. त्यांनी असं काहीतरी पाहिलं आहे जे सामान्य नाही, कारण त्यांना त्याबद्दल माहिती नाही. त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर फार परिणाम झाला नाही कारण मी कमेंट्स फारशा वाचल्या नाहीत. माझे जवळचे लोक मला पाठिंबा देत आहेत, मला इतर कोणत्याही लोकांकडून पाठिंब्याची आवश्यकता नाही.”
रुपाली ‘बिहाइंडवुड्स टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की आशिषने नकारात्मक कमेंट्स आणि मतांचा तिला त्रास होऊ दिला नाही. कारण काहींना त्यांचा निर्णय असामान्य वाटत असला तरी प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते. आशिष यांचे पहिले लग्न पिलू विद्यार्थीशी झाले होते आणि त्यांना अर्थ नावाचा एक मुलगा आहे. रुपालीने खुलासा केला की ती अर्थला भेटली होती. ती म्हणाली, “तो खूप गोड मुलगा आहे. आम्ही खूप चांगल्या गप्पा मारल्या, ज्या गंभीर विषयांवर नव्हत्या. फक्त तो काय करत आहे यावर चर्चा केली. ती फक्त नॉर्मल चर्चा होती. ती एक छोटीशी पण खूप छान भेट होती.”
आशिष यांनी आपल्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना सांगितलं होतं की पिलूने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आम्ही मुलाला सांगितलं, त्याला या प्रक्रियेचा भाग केलं. त्यासाठी त्याला हवा तेवढा वेळ दिला. त्यानंतर दोघेही वेगळे झालो आणि मी आयुष्यात दुसरं लग्न करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला, असं आशिष म्हणाले होते.