अनेक चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता अभिनेता आशिष विद्यार्थी यांना ओळखले जाते. त्यांच्या चित्रपटाची आणि त्यातील अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. ते सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. नुकतंच आशिष विद्यार्थी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आशिष यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ त्यांच्या हल्ली केलेल्या विमान प्रवासादरम्यानचा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकतंच आशीष विद्यार्थी यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांचे चाहते आणि नेटकरी यांनी प्रचंड प्रतिसाद देताना दिसत आहे. या व्हिडीओत एक महिला प्रवासी आशिष विद्यार्थी यांना ओळखत नसल्याचे दिसत आहे. त्यावर आशिषही तिची गंमत करताना दिसत आहे.
आणखी वाचा : बॉलिवूडकरांची दिवाळी पार्टी दणक्यात; पण चर्चा मात्र माधुरी आणि काजोलच्या डान्सचीच…, व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओत आशिष यांच्या पुढच्या सीटवर एक महिला प्रवासी आणि कुटुंब बसले आहे. त्यावेळी ती आशिष विद्यार्थी यांना पाहून ‘मी तुम्हाला कुठे तरी पाहिले’, असे सांगते. पण त्यांना तिने नक्की कुठे पाहिले हे तिला आठवत नाही. यावर आशिष विद्यार्थी हे त्या महिलेला ‘तुम्ही कुठे राहता’ असे विचारतात. त्यावर ती महिला म्हणते, ‘आम्ही ठाण्याला राहतो.’ त्यावर आशिष विद्यार्थी म्हणतात, ‘अच्छा मग कदाचित तुम्ही मला तिकडच्या मार्केटमध्ये पाहिले असेल किंवा बस स्टॉपवर पाहिले असेल.’ त्यानंतर ती म्हणते ‘नाही, मी फार चित्रपट वैगरे पाहत नाही, पण मी तुम्हाला चित्रपटात पाहिल्यासारखे वाटते.’

आणखी वाचा : “मी बालिश…” सतत चिडचिड करणाऱ्या स्वभावावर जया बच्चन स्पष्टच बोलल्या

त्यांच्या दोघांचा या मजेशीर संभाषणाचा व्हिडीओ आशिष यांनी शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान यापूर्वीही अनेकदा आशिष विद्यार्थी यांनी लोक मला सहसा ओळखत नाही, याबद्दल सांगितले होते. द कपिल शर्मा शो यादरम्यान त्यांनी खुलासा केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish vidyarthi shares video from flight female passenger not recognize him viral nrp