अनेक चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून आशिष विद्यार्थी यांना ओळखले जाते. त्यांच्या चित्रपटाची आणि त्यातील अभिनयाची नेहमीच चर्चा होत असते. ते सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. शिवाय सध्या ते वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ ट्राय करतात आणि त्याचा व्हिडिओ व्लॉगच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करतात. यामुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूडमध्ये एवढं काम करूनही आशिष विद्यार्थी यांच्यावर काम न मिळण्याची वेळ आली होती. याबद्दल नुकतंच त्यांनी खुलासा केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना एकाच साच्यातील भूमिका मिळत होत्या, पण त्यांना काहीतरी वेगळं आजमावून बघायचं होतं असं त्यांनी नुकतंच एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. यासाठीच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी सोडून दाक्षिणात्य चित्रपटात काम करायला सुरुवात केल्याचाही खुलासा केला.

आणखी वाचा : प्रीती झिंटाने घेतले गुवाहाटीच्या कामाख्या देवीचे दर्शन; पोस्ट शेअर करत म्हणाली “मंदिरात येऊन…”

‘बॉलिवूड हंगामा’शी संवाद साधताना आशीष विद्यार्थी म्हणाले, “१९९९ मध्ये जेव्हा लोक माझ्याकडे त्याच प्रकारच्या भूमिका घेऊन येऊ लागले आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं, त्यावेळी मी मुंबई सोडायचा निर्णय घेतला आणि मी दक्षिणेत काम शोधायला सुरुवात केली. मला पूर्णपणे काहीतरी वेगळं अनुभवायचं होतं. सुदैवाने मला विक्रमबरोबर ‘दिल’ हा चित्रपट मिळाला, तो चित्रपट हीट झाला अन् मला तमिळ, तेलुगू, कन्नड अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये कामं मिळायला सुरुवात झाली.”

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ व ‘राम सेतू’चं चित्रीकरण झालेल्या मुंबईतील स्टुडिओवर BMC ने फिरवला बुलडोझर; नेमकं कारण जाणून घ्या

पुढे दाक्षिणात्य लोकांचे आभार मनात आशिष म्हणाले, “मी साऱ्या दाक्षिणात्य प्रेक्षकांचा आभारी आहे, त्यांनी मला ज्यापद्धतीने प्रेम आणि पाठिंबा दिला. २००० ते २०१३ मी तिथे प्रचंड काम केलं, तिथल्या लोकांनी मला आपलंसं केलं. यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो. हिंदी चित्रपटसृष्टीतून मात्र मला काम मिळेनासं झालं होतं. मी दक्षिणेत गेलो असल्याने बऱ्याच लोकांनी मला कामासाठी विचारणंसुद्धा बंद केलं.” आशिष विद्यार्थी नुकतेच ‘राणा नायडू’ या वेबसीरिजमध्ये झळकले. यातील त्यांच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish vidyarthi speaks about his shift from bollywood to south films and why he left mumbai avn
Show comments