बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड आणि प्रत्येक पार्टीत त्यांच्याबरोबर दिसणारा ओरी सध्या चांगलाच चर्चेत आहे. ओरीचे पूर्ण नाव ओरहान अवत्रामणी आहे. ओरीचं सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यास अगदी रेखापासून ते सलमान खान व आताच्या काळातील जान्हवी कपूर, सारा अली खान, सुहाना खान व निसा देवगण यांच्याबरोबर त्याचे फोटो आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अब्जाधीश उदय कोटक यांच्या मुलाने माजी मिस इंडियाशी बांधली लग्नगाठ, शाही विवाह सोहळ्याचे फोटो आले समोर

सारा अली खान आणि अनन्या पांडे यांनी नुकतीच ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वात हजेरी लावली. यावेळी ओरीबद्दल करणने या दोघींना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एक्सवर शेअर करत उद्योजक अश्नीर ग्रोव्हरने दिलेलं कॅप्शन चर्चेत आहे. “हे पाहिल्यावर लोक देवाला म्हणतील, अगले जनम मोहे ‘ओरी’ (और ही) किजो” असं कॅप्शन अश्नीरने लिहिलं आहे.

१७ वर्षांचा भाऊ गमावला, उदरनिर्वाहासाठी शेंगदाणे विकले; ३३ वर्षे चाळीत राहणाऱ्या अभिनेत्याने सांगितल्या जुन्या आठवणी

खरंतर व्हिडीओ दोन्ही अभिनेत्रींना ओरीच्या प्रोफेशनबद्दल काहीच माहिती नाही. एपिसोड दरम्यान, शोचा होस्ट करण जोहरने विचारलं “ओरी कोण आहे, तो काय करतो?” सारा म्हणाली, “ओरी? “ओरी कोण आहे हे कोणालाच माहित नाही?” अनन्याला म्हणाली की लोकांना ओरी आवडतो. तर सारा हसत म्हणाली, “ओरी मजेदार व्यक्ती आहे”.

अनन्या म्हणाली, “तो कॅप्शन लिहिण्यात चांगला आहे, मी त्याच्याकडून कॅप्शनबद्दल सल्ला घेत असते. तो काय करतो हे मला माहीत नाही. पण तो स्वत:ला वेळ देतो आणि स्वतःवर काम करतो, असं त्याने सांगितलं होतं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashneer grover post about orry after ananya panday sara ali khan talks about him hrc