शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपटाचा वाद अजूनही सुरूच आहे. राजयकीय मंडळींसह कलाक्षेत्रामधील मंडळींही या वादावर आपलं मत मांडलं. आता निर्माते अशोक पंडित यांनीही ‘पठाण’ वादावर आपलं मत मांडलं आहे. अशोक पंडित यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाशी ‘पठाण’ची तुलना केली. यावर आता ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा – …अन् रणवीर सिंगने चक्क प्राजक्ता माळीचा हात पकडला, अभिनेत्रीही भारावली, म्हणाली, “मला त्याच्याशी…”
“विवेक अग्निहोत्री यांना शिवीगाळ करणं आणि त्यांना ट्रोल करणं बरोबर होतं. कारण तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी शांत बसली होती. त्यामुळे ‘पठाण’वरही तिच टीका व ट्रोलिंग लागू होते.” असं अशोक पंडित यांनी म्हटलं. तसेच त्यांनी ‘पठाण’वर होत असलेली टीका चुकीची आहे असंही म्हटलं आहे.
पुढे अशोक पंडित म्हणाले, ‘द काश्मीर फाइल्स’वर झालेली टीका जर चुकीची होती तर ‘पठाण’साठीही हेच लागू होईल.” यावर विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विवेक यांनी अशोक पंडित यांचं ट्विट रिट्विट करत उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा – लग्न झालं तरी हार्दिक जोशीला एका गोष्टीची खंत, बायकोचा उल्लेख करत म्हणाला, “मी तिला…”
विवेक अग्निहोत्री यांनी फक्त ‘Hmmmm’ असं म्हटलं आहे. अशोक पंडित यांनी ‘पद्मावत’ व ‘उडता पंजाब’ चित्रपटांनाही विरोध होत असताना पाठिंबा दर्शवला. आता ‘पठाण’ चित्रपटाच्या पाठिशीही ते उभे आहेत.