आशुतोष गोवारीकर हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘लगान’, ‘स्वदेस’ आणि ‘जोधा अकबर’सारखे अप्रतिम चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेआहेत. जेव्हा ते एखाद्या चित्रपटाची घोषणा करतो तेव्हा लोकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचते. अशाच त्यांच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेमुळे सगळेच प्रेक्षक फार उत्सुक असल्याचं दिसत आहे.
नुकतंच आशुतोष गोवारीकर यांनी आदि शंकराचार्य यांच्यावर बेतलेल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देत आशुतोष यांनी आगामी ‘शंकर’ या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे. ही पोस्ट करताना आशुतोष लिहितात, “आदि शंकराचार्य यांचं महान कार्य, ज्ञान व जीवनावर कलात्मक अंगाने प्रकाश टाकायचं भाग्य माझ्या नशिबी लाभलं आहे. हा खूप मोठा मान आहे.”
आणखी वाचा : सुपरहीट मराठी चित्रपट ‘सुभेदार’ आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर; वाचा कुठे पाहायला मिळणार?
याबरोबरच हा चित्रपट ‘आचार्य शंकर सांस्कृतिक एकता न्यास’ व ‘एकता धाम’ यांच्या सहयोगाने ते लोकांसमोर आणणार असल्याचंही आशुतोष यांनी जाहीर केलं. या पोस्टबरोबर आशुतोष यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेयर केले आहे. ‘शंकर – आध्यात्मिक जनरल’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. भारतातील एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन खुद्द आशुतोष गोवारीकर करणार आहेत.
‘मोहेंजो दारो’ व ‘पानिपत’ या आशुतोष गोवारीकर यांच्या दोन्ही चित्रपटांना फारसं यश मिळालं नसल्याने या आगामी चित्रपटाकडून प्रेक्षकांना जास्त अपेक्षा आहेत. चित्रपटाबद्दल आणखी माहिती समोर आलेली नाही. शिवाय शंकराचार्य यांच्या पात्राला आशुतोष गोवारीकर न्याय देऊ शकतील का अशीही शंका काही प्रेक्षकांच्या मनात आहे. कारण हे भरतातीत सर्वात मोठं व उत्तुंग असं व्यक्तिमत्त्व आहे अन् हा विषय एका विशिष्ट धर्माशी जोडलेला आहे. यामुळेच या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण दिसणार? आशुतोष गोवारीकर यांच्या दृष्टीकोनातून ही कथा काशी पडद्यावर उलगडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.