आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आशुतोष गोवारीकर यांचा चित्रपट त्या काळातील ब्लॉकबस्टर ठरला होता. आमिर खानने या चित्रपटात भुवनची भूमिका साकारली होती. पण, या भूमिकेसाठी आशुतोष गोवारीकर यांची पहिली पसंती आमिर खान नव्हे, तर अभिषेक बच्चन होता. लगानला २२ वर्षे पूर्ण झालीत, त्यानिमित्ताने गोवारीकर यांनी हा खुलासा केला.

हेही वाचा – करणच्या हातावर रचली द्रिशाच्या नावाची मेहंदी, तर सनी देओलच्या हातावरील खास मेहंदीने वेधलं लक्ष

Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Aishwarya Rai Abhishek Bachchan
“ऐश्वर्या-अभिषेक बच्चनचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध…”, ‘कुछ ना कहो’फेम अभिनेत्रीचा खुलासा
vivek oberoi makes rare comment about aishwarya rai salman khan
ऐश्वर्या राय, सलमान खान…; दोघांची नावं ऐकताच विवेक ओबेरॉयने फक्त ३ शब्दांत दिलं उत्तर, अभिषेक बच्चनबद्दल म्हणाला…
Amitabh Bachchan
“तुमचे वय झाले आहे, तुम्ही…”, अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारल्यानंतर मुलगा व नातवंडे ‘अशी’ देतात उत्तरे
shalini pande did not recognize aamir khan
जुनैदच्या हिरोईनने आमिर खानला ओळखलंच नाही; मेसेजवर विचारलं ‘तुम्ही कोण?’, अभिनेत्रीने स्वतःच सांगितला किस्सा
diljit dosanj shahrukh khan kkr 1
Video : दिलजीत दोसांझ भर कॉन्सर्टमध्ये बोलला असं काही की…; शाहरुख खान प्रतिक्रिया देत म्हणाला, “पाजी तू तर…”
Marathi Actor Sourabh Chougule Post
शाहरुखच्या मुलांची नावं ठळक अक्षरात, तर मराठी कलाकारांना…; ‘ते’ पोस्टर पाहून सौरभ चौघुलेचा सवाल, म्हणाला…

‘ई-टाइम्स’शी बोलताना गोवारीकर यांनी सांगितलं की त्यांना चित्रपटात अभिषेक बच्चनला घ्यायचं होतं, पण शेवटी त्यांना आमिर खानला ही भूमिका ऑफर करावी लागली. हा चित्रपट करण्यासाठी अभिषेकची खूप मनधरणी केली, पण तो तयार झाला नाही. अभिषेकला वाटत होतं की तो या पात्रात बसणार नाही.

हेही वाचातमन्ना भाटियाने प्रेमाची कबुली दिल्यानंतर विजय वर्मा म्हणाला, “माझ्या आयुष्यात…”

अभिषेक एका मुलाखतीत म्हणाला होता, “लगानसारख्या मोठ्या चित्रपटासाठी मी खूप नवीन आणि लहान होतो. अर्थात, हा चित्रपट खूप मोठा आहे याची मला जाणीव होती, पण मी त्याचा भाग व्हायला तयार नव्हतो.” आमिरने ती भूमिका उत्तम साकारली होती, त्यामुळे अभिषेकने आनंद व्यक्त केला होता. हा चित्रपट नाकारला याबद्दल मनात कोणतीही खंत नसल्याचंही तो म्हणाला होता.

दरम्यान, ‘लगान’च्या वर्धापनदिनानिमित्त आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसने चित्रपटाच्या सेटवरील अनेक जुने फोटो शेअर केले होते. २२ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीला वेगळी दिशा देणारा चित्रपट आहे.

Story img Loader